Aditi Rao Hydari : अदिती राव हैदरी एअरपोर्टवर अडकली, अभिनेत्रीने एअरलाईन्सवर व्यक्त केला तीव्र संताप; नेमकं प्रकरण काय?
Aditi Rao Hydari : हिरामंडी फेम अभिनेत्री अदिती राव हैदरीला एअरपोर्टवर एका विचित्र प्रसंगाला समोरं जावं लागलं आहे. त्याच्याविषयी तिने तिच्या सोशल मीडियावर माहिती दिली.
Aditi Rao Hydari : हिरामंडी (Heeramandi) या सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari ) एक विचित्र प्रसंगाला समोरी जात आहे. अदिती राव हैदरी मागील चोवीस तासांपासून तिच्या एअरपोर्टवर तिच्या सामानाची वाट पाहत होती. पण अद्यापही तिला हे सामान मिळालेलं नाही. यामुळे अदिती ही हीथ्रो विमानतळावर अडकलीये. अदितीसोबत इतर अनेक लोकंही अडकली आहेत. अदितीने तिच्या सोशल मीडियावर या संदर्भातली माहिती दिली आहे.
अदितीने तिच्या सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये ती हीथ्रो विमानतळावरील तिची आणि त्या विमानतळवरील परिस्थिती दाखवत आहे. तसेच विमानतळ प्रशासनाचा हलगर्जीपणावर देखील अदितीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. 32 तासांच्या फ्लाईटनंतर अदिती आता जवळपास 24 तासांपेक्षा जास्त वेळ तिच्या सामानासाठी थांबावं लागलं आहे. जेव्हा तिने विमानतळावरील अधिकाऱ्यांना तिच्या सामानाविषयी चौकशी केली, त्यावेळी त्यांनी तिला एअरलाईन्ससोबत संपर्क साधण्यास सांगितलं.
अदितीने पोस्टमध्ये काय म्हटलं
अदितीने एक्स पोस्ट करतही याबद्दल सोशल मीडियावर भाष्य केलं आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, मुंबईहून दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी माझं फ्लाईट लंडन एअरपोर्टवर लँड झालं. पण अजूनही मला माझं सामान मिळालेलं नाहीये. माझ्यासोबत अनेक प्रवास थकून असेच बसले आहेत. लहान मुलंही उपाशी आहेत. काहीजण व्हिलचेअरवरही बसलेले आहेत. त्यामुळे सध्या रिकामा लगेज बेल्ट पाहून आमचं सामान कधी येईल याची आम्ही वाट पाहतोय.
पुढे तिने म्हटलं की, या लोकांना त्यांच्या जबाबदारीची अजिबात जाणीव नाही. अदितीच्या या पोस्टवर संबंधित कंपानीने देखील लवकरात लवकर सामान मिळवून देण्याचं आश्वासन तिला सोशल मीडियावर दिलं आहे. पण आता जवळपास 30 तासांपेक्षा अधिक वेळ उलटला असला तराही तिला तिचं सामान मिळालेलं नाहीये.
19 hours and ticking….
— Aditi Rao Hydari (@aditiraohydari) June 26, 2024
Also, @British_Airways
just putting it out there. This isn't my first rodeo with the brits...watch#Heeramandi on @NetflixIndia and you'll know that I'm not one to go down without a fight for justice!
So can you free our bags! ASAP!
I have a conference…
अनेकदा सेलिब्रेटींना विमानतळावर असे अनुभव येत असतात. त्याविषयी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त देखील होत असतात. आता अदितीची अडचणीतून कधीपर्यंत सुटका होते, हे पाहणं गरजेचं ठरेल. तसेच यावर आता पुन्हा तिला एअरलाईन्सकडून काय उत्तर देण्यात येणार याकडेही साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ही बातमी वाचा :
Ashwini bhave : लिंबू कलरची साडी अन्..., अश्विनी भावेंसाठी सिनेमाचा दिग्दर्शकच झाला व्हिडीओग्राफर