(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahesh Babu : 'बॉलिवूडला मी परवडत नाही'; हिंदी चित्रपटसृष्टीबाबत महेश बाबूचं मोठं वक्तव्य
महेश बाबूनं (Mahesh Babu) मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली.
Mahesh Babu : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूनं (Mahesh Babu) मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. यावेळी महेश बाबूनं बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी याबाबत सांगितलं. ट्रेलर लाँचच्या वेळी महेश बाबू म्हणाला की, 'बॉलिवूडला मी परवडत नाही' त्याच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सुरू आहे.
मला पॅन इंडिया स्टार व्हायचं नाहिये: महेश बाबू
मेजर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी महेश बाबूनं सांगितलं, 'माझा उद्देश पॅन इंडिया स्टार व्हायचा नाहीये. मला दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरात यश मिळवून द्यायचंय. मला आधी पासूनच तेलगू चित्रपटांमध्ये काम करायचे होते आणि माझी इच्छा होती की भारतातील सर्व लोकांनी हे चित्रपट पहावेत. आता असं होतं आहे त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. मला वाटतं की तेलगू चित्रपटांमध्येच माझी ताकद आहे.' महेश बाबूनं पुढे सांगितलं, 'मला बॉलिवूडमधून खूप ऑफर्स आल्या. बॉलिवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही. तेलगू चित्रपटांमुळेच मला स्टारडम आणि लोकांचं प्रेम मिळालं. '
मेजर या चित्रपटाचे कथानक शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. आदिवी शेषनं या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन शशि किरण टिक्का यांनी केलं आहे. चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया आणि महेश बाबूच्या जीएमबी एंटरटेनमेंटनं केली आहे.
1983 साली 'पोरातम' या चित्रपटातून बाल भूमिकेच्या माध्यमातून महेश बाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 1999 साली 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.
हेही वाचा :