Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: प्रेक्षकांची लाडकी 'तुलसी' येताच, 'अनुपमा'वर टीकेची झोड; 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'ची रिलीज डेट जाहीर
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Release Date Announced: एकता कपूरचा लोकप्रिय शो 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'चा दुसरा सीझन लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. आता शोची तारीखही जाहीर झाली आहे.

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Release Date Announced: 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'चा (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2) पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. त्यासोबतच मेकर्सनी स्मृती इराणींच्या (Smriti Irani) सीरियलची टेलिकास्ट डेट आणि वेळेचाही खुलासा केला आहे. आपली लाडकी मालिका पुन्हा येत असल्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या 'तुलसी'ला भेटण्याची ओढ लागली आहे. अशातच 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'चा प्रोमो आल्यानंतर आता रुपाली गांगुलीची (Rupali Ganguly) सुपरहिट सीरियल 'अनुपमा' (Anupamaa Serial) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
एकता कपूरचा लोकप्रिय शो 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'चा दुसरा सीझन लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. निर्मात्यांनी स्मृती इराणी स्टारर 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'चा पहिला प्रोमो रिलीज केला आहे. यासोबतच स्मृती इराणींच्या कमबॅक सीरिअलच्या प्रसारणाची तारीख आणि वेळही जाहीर करण्यात आली आहे. स्टार प्लसनं 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'चा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रोमोमध्ये एक कुटुंब जेवण करताना आणि तुलसी विराणी पुन्हा पडद्यावर परतणार की नाही? यावर चर्चा करताना दिसतेय. यानंतर, तुलसीच्या भूमिकेत असलेली स्मृती इराणी हात जोडून म्हणते, "मी नक्कीच येईन कारण आमचं 25 वर्षांचं नातं आहे. आता तुम्हाला पुन्हा भेटण्याची वेळ आली आहे." हा प्रोमो येताच, रूपाली गांगुलीचा शो 'अनुपमा' ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'चा प्रोमो (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Promo)
'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'च्या प्रोमोनं चाहत्यांची उत्सुकता वाढवली असताना, या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक 'अनुपमा'बद्दल आपली चिडचिड व्यक्त करत आहेत. अनुपमामध्ये येणाऱ्या ट्वीस्ट आणि टर्न्समुळे प्रेक्षक निराश झाले असून कंटाळले आहेत, ज्याबद्दल ते सोशल मीडियावर तक्रार करत आहेत. 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'च्या प्रोमोच्या कमेंट सेक्शनवर नजर टाकली तर, बरेच लोक म्हणतात की, आता 'अनुपमा' शो बदलला पाहिजे, तर काहीजण त्याचा टाईम स्लॉट बदलण्याबद्दलही बोलले.
'अनुपमा' मालिका बंद करण्याची मागणी
एका युजरनं कमेंट करत लिहिलं की, "आता 'अनुपमा' मालिका थांबवा, नवी मालिका आणा. तसेच, दुसऱ्यानं लिहिलंय की, "अनुपमा थांबवा किंवा 10 वाजण्याचा स्लॉट द्या, ते चांगले होईल." दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "तुलसी विराणी परत आली आहे... अनुपमाचा वाईट काळ आता आला आहे." आणखी एकानं लिहिलंय की, "कृपया अनुपमा शो बंद करा."
View this post on Instagram
2020 मध्ये सुरू झालेली 'अनुपमा' सीरिअल
2020 मध्ये कोरोना काळात रुपाली गांगुली स्टारर 'अनुपमा' हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाला. या मालिकेत रुपाली गांगुलीसोबत सुधांशू पांडे, मदलसा शर्मा, निधी शाह, पारस कालनावत, अल्पना बुच आणि अनघा भोसले असे कलाकार दिसले होते, त्यापैकी बहुतेक जण आता शो सोडून गेले आहेत. हा शो एकेकाळी प्रेक्षकांचा आवडता होता आणि टीआरपीमध्येही नंबर 1 होता, परंतु कलाकारांनी शो सोडल्यानं प्रेक्षकांचा हिरमोड झालेला.
पहिला भाग 29 जुलै रोजी प्रसारित होणार
दुसरीकडे, स्मृती इराणी यांच्या कल्ट शो 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'बद्दल बोलायचं झालं तर, त्याचा दुसरा सीझन 29 जुलैपासून रात्री 10.30 वाजता प्रसारित होणार आहे. या मालिकेत स्मृती इराणी पुन्हा एकदा तुलसीच्या भूमिकेत दिसणार आहेत. अशा परिस्थितीत, प्रेक्षक त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. याचं एक कारण म्हणजे, या मालिकेशी संबंधित त्यांच्या जुन्या आठवणी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























