Ramayana Actress Urmila Bhatt Murdered Case: आधी हात-पाय बांधून टॉर्चर केलं, नंतर गळ्यावर सुरा फिरवून संपवलं; 'रामायण'मधील 'या' अभिनेत्रीची झालेली निर्घृण हत्या
Ramayana Actress Urmila Bhatt Murdered Case: 'रामायण' या कल्ट-क्लासिक मालिकेनं अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. त्यापैकी एक होत्या उर्मिला भट्ट, ज्यांनी या शोमध्ये सीता मातेच्या आई महाराणी सुनैना यांची भूमिका साकारली होती.

Ramayana Actress Urmila Bhatt Murdered Case: रामानंद सागर (Ramanand Sagar) याची पौराणिक मालिका (Mythological Series) 'रामायण' (Ramayana) आणि त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. मालिका टेलिव्हिजनवर प्रसारित झाल्यापासून आजपर्यंत प्रेक्षकांनी 'रामायण'वर भरभरून प्रेम केलं. 'रामायण' 1987 ते 1988 दरम्यान डीडी नॅशनल चॅनलवर प्रसारित करण्यात आलं आणि आता ते कल्ट क्लासिक बनलं आहे. यामुळे ऑनस्क्रीन प्रभू श्रीराम अरुण गोविलपासून (Arun Govil) सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांच्यापर्यंत सर्वांना घराघरात प्रसिद्धी मिळाली. फक्त प्रसिद्धीच नाही, अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांना प्रेक्षक खऱ्या आयुष्यातही राम आणि सीता मानू लागले. टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर गाजलेल्या मालिकेत इतरही अनेक कलाकार झळकलेले, त्यापैकी एक उर्मिला भट्ट. त्यांनी या मालिकेत सीता मातेच्या आई महाराणी सुनैनाची भूमिका साकारली होती. पण, ऑनस्क्रिन झळकलेल्या या अभिनेत्रीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र तिचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला.
'रामायण' या कल्ट-क्लासिक मालिकेनं अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. त्यापैकी एक होत्या उर्मिला भट्ट, ज्यांनी या शोमध्ये सीता मातेच्या आई महाराणी सुनैना यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक करण्यात आलेलं. उर्मिला भट्ट म्हणजे, त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये समाविष्ट होणारं नाव, ज्या गुजरात, राजस्थान आणि हिंदी सिनेसृष्टीत सक्रिय होत्या. पण अचानक एक दिवस त्यांच्या मृत्यूचं वृत्त आलं आणि अख्खी इंडस्ट्री हादरली. खरं तर, त्यांचा मृत्यू कोणत्याही आजारपणामुळे किंवा अपघातामुळे झाला नव्हता, तर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आणि त्या त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आलेल्या.
View this post on Instagram
उर्मिला भट्ट यांची हत्या कशी झाली?
22 फेब्रुवारी 1997 रोजी भट्टची तिच्या जुहू येथील राहत्या घरी हत्या करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, उर्मिला भट्ट यांचा मृत्यू दुसऱ्या दिवशी उघडकीस आला, जेव्हा त्यांचा जावई, त्यांना भेटण्यासाठी आला आणि कोणीही दाराची बेल वाजवली नाही. त्यानंतर जावयानं ताबडतोब आपल्या पत्नीला फोन केला आणि त्यानंतर दोघांनाही कळलं की, घरात दरोडेखोर घुसलेले आणि त्यांच्या आईची त्यांनी निर्घुण हत्या केलेली.
ज्यावेळी उर्मिला भट्ट यांचा जावई आणि मुलगी घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी घरातल्या सर्व वस्तू विखुरलेल्या होत्या आणि उर्मिलाचा मृतदेह जमिनीवर पडला होता. घराचं दार उघडल्यानंतर समोर जे दिसत होतं, त्यावरुन हे स्पष्ट होत होतं की, उर्मिला भट्ट यांचा मृत्यू अत्यंत क्रूरपणे करण्यात आली आहे. अत्यंत खेदजनक बातमी अशी की, उर्मिला भट्ट यांचे खुनी आजही पकडले गेलेले नाहीत आणि त्यांची हत्या आजही एक मोठं गूढ आहे.
View this post on Instagram
मिडिया रिपोर्टनुसार, ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी उर्मिला भट्ट घरात एकट्या होत्या आणि त्यांचे पती काही कामानिमित्त बडोद्याला गेलेले. 63 वर्षांच्या वयात उर्मिलाचा मृत्यू झालेला. सध्या तिच्या कुटुंबात तिचा पती, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिच्या निधनानं संपूर्ण मनोरंजन उद्योगाला धक्का बसला.
70-80 दशकात मालिकाविश्व, सिनेसृष्टी गाजवणारी गुणी अभिनेत्री
1 नोव्हेंबर 1993 रोजी जन्मलेल्या उर्मिला यांनी थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर राजकोटमधील संगीत कला अकादमीमध्ये लोक नृत्यांगना आणि गायिका म्हणून सामील झाल्या. जेसल तोरण या गुजराती नाटकानं त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. यानंतर उर्मिला यांनी 75 हून अधिक गुजराती आणि 15-20 हून अधिक राजस्थानी चित्रपटांमध्ये काम केलं.
1960 च्या उत्तरार्धात, त्यांनी हिंदी चित्रपट उद्योगात प्रवेश केला आणि सूंघुर्श (1968) आणि हमराज (1967) सारखे चित्रपट केले. आंखियों के झारोखो से (1978), गीत गाता चल (1975), बेशरम (1978), राम तेरी गंगा मैली (1985), बालिका बधू (1976), धुंध या सिनेमांमध्ये उर्मिला भट्ट महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकलेल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























