KRK Called Govinda is Mentally Ill: गोविंदा मानसिकदृष्ट्या अस्थिर? प्रसिद्ध अभिनेत्याचा उदाहरण देत खळबळजनक दावा; पुरावेही दिले
KRK Called Govinda is Mentally Ill: आपला सेन्स ऑफ ह्युमर वापरुन विनोदाचं टायमिंग साधणारा गोविंदा सध्या मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, असा दावा प्रसिद्ध अभिनेत्यानं केलाय.

KRK Called Govinda is Mentally Ill: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) गोविंदा (Govinda) 90च्या दशकातील गुणी अभिनेत्यांपैकी एक. नव्वदच्या दशकात गोविंदानं एकापेक्षा एक दमदार चित्रपट करुन धुमाकूळ घातला. फक्त चित्रपटच नाहीतर यातील गाणीही प्रेक्षकांना वेड लावणारी होती. कधी सिरिअस, तर कधी खळखळवून हसवणारे चित्रपटातून गोविंदानं कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. असं असलं तरीसुद्धा गोविंदा गेल्या बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून प्रोफेशनल लाईफमुळे नाहीतर, गोविंदा वेगळ्याच एका कारणानं चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा एकमेकांपासून विभक्त होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व गदारोळात आता एका प्रसिद्ध अभिनेत्यानं गोविंदाबाबत खळबळजनक दावा केला आहे. गोविंदा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा दावा केला आहे.
गोविंदानं त्याच्या काळात दुल्हन राजा, आंखे, राजा बाबू, दीवाना मस्ताना, कुली नंबर 1, हसिना मान जायेगी असे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. आपला सेन्स ऑफ ह्युमर वापरुन विनोदाचं टायमिंग साधणारा गोविंदा सध्या मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर... थबकलात ना? सुपरस्टार गोविंदा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा दावा एका प्रसिद्ध अभिनेत्यानं केला आहे.
View this post on Instagram
गोविंदा मानसिकदृष्ट्या अस्थिर?
स्वयंघोषित फिल्म क्रिटिक कमाल आर खान उर्फ केआरके यांनी दावा केलाय की, गोविंदा सध्या मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. तसेच, पुढे बोलताना केआरकेनं गोविंदा मानसिकदृष्ट्या अस्थिर का झालाय? याचं कारणंही सांगितलं आहे. यामागचं कारण खरंच हैराण करणारं आहे.केआरकेनं आरोप केलाय की, "जे म्हणतात की, बॉलिवूडच्या काही लोकांनी गोविंदाचं करिअर संपवलं आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे, गोविंदानं स्वतःचं करिअर संपवलं आहे, कारण तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे.
या व्हिडीओ दरम्यान केआरकेनं म्हटलं आहे की, 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटादरम्यान गोविंदा अशा गोष्टी करायचा, ज्या लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी पुरेशा होत्या. यावेळी त्याला पाहून लोकही घाबरले. गोविंदा त्याच्या दिवंगत आईशी तास्नतास बोलत असे आणि त्यामुळेच त्यानं स्वतःचं करिअर उद्ध्वस्त केलं. जर तो चित्रपटसृष्टीतील कोणाला दोष देत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे.
गोविंदांचा शेवटचा चित्रपट
एकेकाळचा सुपरस्टार अभिनेता, पण सध्या तो कोणत्याही प्रोजेक्टचा भाग नाहीये. सध्या त्याला चित्रपट मिळत नाहीत. सर्वात शेवटचा चित्रपट गोविंदानं 2019 मध्ये कॉमोडी रंगीला राजा केला होता. गोविंदाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो फ्लॉप ठरला. दरम्यान, केआरकेनं केलेल्या आरोपांवर गोविंदा काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'जाट'कडून बॉर्डरचा रेकॉर्ड चक्काचूर; 'गदर'चीही शिकार करणार? 5 दिवसांत किती कमावले?























