एक्स्प्लोर

Kiran Mane : गद्दारांचे घाव झेलून हसतमुखानं राजीनामा देऊन वर्षा बंगला सोडला ! किरण मानेंनी उद्धव ठाकरेंसाठी शेअर केली 'त्या' दिवशीची पोस्ट

Kiran Mane : किरण माने यांनी उद्धव ठाकरेंसाठी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

Kiran Mane : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपामुळे बरीच खळबळ माजली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड हे महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर बरेच दावे प्रतिदावे, वार प्रतिवार हे सगळं झालं. पण त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्या पद्धतीने राजीनामा देत मुख्यमंत्री पद सोडलं त्याचं कौतुकही झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर किरण माने (Kiran Mane) यांनी एक पोस्ट केली होती.  त्याच पोस्टची सध्या चर्चा सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतरची पोस्ट किरण माने यांनी शेअर केलीये. शनिवार 27 जुलै रोजी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस झाला. त्याचनिमित्ताने किरण मानेंनी ही पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याच्या दिवशी काय घडलं या घटनेचा पुनरुच्चार केला आहे. 

किरण माने यांनी काय म्हटलं?

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'ही दोन वर्षांपुर्वीच्या त्या दिवशीची पोस्ट आहे,  ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी गद्दारांचे घाव झेलून हसतमुखानं राजीनामा देऊन वर्षा बंगला सोडला. ...उद्धवजी, एकच शब्द : 'ग्रेसफुल' !सत्यघटना सांगतो. सातार्‍याजवळ खिंडवाडी नांवाचं एक छोटं गांव आहे. तिथं एका मित्राकडं काल मी जेवायला गेलो होतो. एकतर गांव लै छोटं. त्यात गांवापास्नं लांब शेतात एकाकी असलेलं घर. लै दिवसांनी जमिनीवर मांडी ठोकून जेवायला बसलो, आणि 'ती' बातमी दिसली...'

'कुणाचा विश्वास बसणार नाही, पण तुम्ही राजीनामा दिलात हे कळल्यावर, त्या घरातला एकेक माणूस हळहळला. च् च् च् च् असे आवाज आले. काहीजणांच्या डोळ्यांत पाणी आलं. घरातल्या तरण्या लोकांपास्नं म्हातार्‍यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं 'चांगला मानूस व्हता'!उद्धवजी, खरं सांगू? तुमच्या आयुष्यात जे घडलं, ती राजकारणात 'कॉमन' गोष्ट आहे. खर्‍या आयुष्यात गरीब,श्रीमंत,सामान्य,सेलिब्रिटी..त्याच्या त्याच्या पातळीवर विश्वासघाताचं दु:ख सगळ्यांना पचवावं लागतं.'

'पण अशावेळी खूप कमी लोक तुमच्यासारखे 'धीरोदात्त' असतात ! जे घडलं ते 'माणूस' म्हणून उद्ध्वस्त करणारं होतं. तुम्ही आतनं 'तुटला' नसाल का हो? काळजाला घरं पडली नसतील का? जी माणसं तुमच्या पक्षानं शून्यातनं वर आणली, त्या माणसांबरोबरचे सुरूवातीपासूनचे कित्येक आनंदा-दु:खाचे क्षण तुमच्या डोळ्यांसमोर तरळले नसतील का?'

'कुणी म्हणेल, 'ही राजकारणी लोकं लै पोचलेली असतात. सगळे सारखेच.' हे ही मान्य. तरीही मी फक्त 'माणूस' म्हणून विचार करतोय. मी स्वत: यातनं गेलोय. जवळच्यांनी पाठीत खंजीर खुपसल्यावर वेदना होतातच. काळीज तुटतंच. तरीही किती संयमानं, उद्वेग-चिडचिड न करता तुम्ही शांतपणे पद सोडलंत !'

'पण आता आज एकाही नेत्याकडं नसेल अशी एक गोष्ट आता तुमच्याकडं आहे. आता तुमच्याजवळ जे उरलेत ते अत्यंत नि:स्वार्थी, निष्ठावान, शुद्ध - स्वच्छ मनाचे कार्यकर्ते आहेत. भले संख्या कमी असेल, पण जे आहेत ते मनाच्या तळापास्नं 'तुमचे' आहेत. जितक्या नि:स्वार्थीपणे तुमच्यासोबत रश्मीजी आणि आदित्य आहेत, तितक्याच नितळ भावनेनं आता उरलेले सगळे शिवसैनिकही तुमचे आहेत. गाळ बाजूला गेला, आता शंभर टक्के 'प्यूअर' असलेला एकेक माणूस तुमच्यासोबत आहे. नशीबवान आहात !'
 
'तुम्हाला राखेतनं झेप घ्यायचीय.. शून्यातनं विश्व उभं करायचंय.. हे लिहीणारा मी ना शिवसैनिक, ना राजकारणी. तुम्ही आयुष्यात कुठली मदतही मला केलेली नाही आणि मी ती अपेक्षाही कधी ठेवली नाही. तरीही मला तुमच्याबद्दल आज हे वाटतंय, ही तुमची 'ॲचिव्हमेन्ट' आहे , अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. ती त्यांनी रिशेअर केली आहे.' 

'या पोस्टचा शेवट करत त्यांनी म्हटलं की, उद्धवजी, आज मी शिवसैनिक आहे ! थेट मातोश्रीवर बोलावून तुम्ही मला शिवबंधन बांधलंत. आता कळतंय, बाहेरून तुम्ही जसे वाटत होतात, तसेच 'आतून'ही आहात. नितळ, निर्मळ आणि संवेदनशील ! एक दिवस उशीरा का होईना, पण तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.'

ही बातमी वाचा : 

Shubhangi Gokhale : 'सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद व्हायला हवेत, कारण आपण आपल्या देवाचा अपमान करतोय', शुभांगी गोखलेंचं स्पष्ट मत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget