एक्स्प्लोर

'किरण त्या अशोक सराफशी दोस्ती कर पन निळू फुल्याच्या नादाला लागू नगं', किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane : 'किरण त्या अशोक सराफशी दोस्ती कर पन निळू फुल्याच्या नादाला लागू नगं', किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर सातत्याने भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका पाहायला मिळाली आहे. दरम्यान, आता त्यांची सिनेक्षेत्रातबाबतची पोस्ट चर्चेचा विषय बनलीये. किरण माने (Kiran Mane) यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ,दिवंगत अभिनेते निळू फुले आणि त्यांच्या आजीबाबतचा एक किस्सा लिहिलाय. किरण मानेंनी (Kiran Mane) पोस्टमध्ये काय लिहिलंय? जाणून घेऊयात.. 

किरण माने यांची संपूर्ण पोस्ट

"किरन, त्या अशोक सराफशी दोस्ती कर पन निळू फुल्याच्या नादाला लागू नगं..लै बेकार हाय त्यो...तस्ली संगत लै वंगाळ." ...सातार्‍यातल्या माझ्या घरी निळू फुले येऊन गेले हे कळाल्यावर आजी घाबरून म्हन्लीवती. तिला वाटलं आपला नातू बिघडला ! तिला सिनेमातलं सगळं खरं वाटायचं. कितीही समजाऊन सांगीतलं तरी पटायचं नाही तिला...

आजीला आम्ही 'काकी' म्हणायचो. आईची आई. लै माया केली तिनं माझ्यावर. सगळ्याच नातवंडांवर तिचा जीव होता. ल्हानपणी सुट्टीत आजोळला, बारामतीजवळ कोर्‍हाळ्याला जाताना मला एकच ओढ असायची ती म्हणजे तिच्या हातचा शिरा ! ती शिर्‍याला 'गरा' म्हणायची. माझ्या इतर भावंडांना पोहे लागायचे. पण काकी "माज्या किरन्याला गरा आवाडतो बया" म्हणत खास माझ्यासाठी वेगळा शिरा करायची. रोज. लै लाड करायची. भल्या पहाटे अंगणात बंब तापवून घंघाळ्यात गरम पाणी काढून आम्हाला अंघोळ घालण्यापासून रात्रीच्या जेवणापर्यन्त तिला अखंड राबताना पहायचो... रात्री मात्र गुडूप झोपेपर्यन्त आमच्याशी गप्पा मारत बसायची. जुन्या आठवणी सांगायची. आजोबांचा एक घोडा होता. तगडा. घोड्यावरुन ते बारामतीवरून सातारला जायचे. त्यांचे खूप किस्से सांगायची...
आमची उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर परत निघताना मामा बैलगाडी तयार करायचे. गोनपाटात भात्यान भरून त्याची गादी टाकून, बैलं जुंपायचे. थोपटे वस्तीपास्नं स्टँडवर जायला बैलगाडी निघाली की काकींच्या डोळ्यातून आसवांच्या धारा सुरू व्हायच्या. आमच्याकडे बघत डोळे पुसत ती गाडीमागं लांब-लांबपर्यन्त चालत यायची. आम्ही 'टाटा' करत हात हलवायचो. गाडी दिसेनाशी होईपर्यन्त आमच्याकडे बघत बसायची...

सगळ्या सुना आणि नातसुनांशी काकींची घनिष्ट मैत्री होती ! एवढेच नव्हे तर शेजारपाजारच्या सुना आणि सासवांबरोबरही तिचे गुळपीठ होते. सगळ्यांच्या तक्रारी ऐकायच्या-समजुती काढायच्या, पण इकडचे तिकडे करायचे नाही. यामुळे सगळीकडे काकी 'लोकप्रिय'.
बालपण आणि तरुणपण लै कष्टात आणि हलाखीत गेलं पण त्याची जर्राही खंत तिने कधी बोलून दाखवली नाही. बख्खळ आयुष्य लाभलं तिला. पोरांचं, नातवंडांचं अफाट वैभव बघितलं. पूर्वी बैलगाडीही नशिबात नव्हती, पण शेवटच्या काळात आलिशान कारमधनं फिरली. नातवंडांची मुलंबी तिच्या मांडीवर खेळली !

जवळजवळ दहा वर्ष उलटून गेली. मी मुंबईत होतो. नाटकाचे सलग प्रयोग लागले होते. प्रयोगाला जातानाच फोन आला 'काकी गेल्या'... मेंदू बधिर झाला. अस्वस्थ झालो. काकींचं अंत्यदर्शनही घेता येणार नाही या जाणीवेनं ढसाढसा रडलो. एकटाच. योगायोगानं त्यानंतर साताठ दिवसांनंतरच बारामतीजवळ एका ॲड फिल्मचे शूटिंग होते. ते संपवून मामाकडं गेलो. सतत उत्साहानं सळसळणारं माझं आजोळ पहिल्यांदा एवढं उदास आणि भकास पाहिलं मी. सगळं होतं पण माझी काकी नव्हती ! 
...खरंतर माणूस गेल्यावर महिनाभर तरी घरात गोडधोड करत नाहीत पण मामींनी माझ्यासाठी शिरा केला ! म्हणाल्या "लाडका नातू आलाय. 'गरा' केला नाही तर काकींना बरं वाटंल का?"

...डोळे भरुन आले. गळा दाटून आला. घास घशाखाली उतरेना. ...हा जुना फोटो आज अचानक फेसबुकनं वर काढला. काकी जाण्यापूर्वी चार महिने आधी काढलेला. काकींचा 'बर्थ डे' साजरा केला होता आम्ही. वयाची नव्वदी पार झाली होती. त्या काळात 'जन्मतारखा' कुठल्या माहिती? असाच मजेमजेत आम्ही वाढदिवस केला. ओवाळले. केक कापला... 'फोटू' काढला... हा तोच फोटो.. शेवटचा !

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Weather Update: मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला, 10 जूनपर्यंत पाऊस थांबणार; कृषी विभागाचं महत्वाचं आवाहन

lagaan फेम अभिनेत्री सध्या कुठे आहे? ग्रेसीने बॉलिवूड का सोडलं? वयाच्या 44 व्या वर्षीही अविवाहित

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget