lagaan फेम अभिनेत्री सध्या कुठे आहे? ग्रेसीने बॉलिवूड का सोडलं? वयाच्या 44 व्या वर्षीही अविवाहित
gracy singh : lagaan फेम अभिनेत्री सध्या कुठे आहे? ग्रेसीने बॉलिवूड का सोडलं? वयाच्या 44 व्या वर्षीही अविवाहित

gracy singh : ‘लगान’ हा आमिर खानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट मानला जातो. या सिनेमाला सर्व स्तरातील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. मात्र आज आपण या चित्रपटातील अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने आपल्या अभिनयाने (gracy singh) या चित्रपटात वेगळी छाप सोडली होती. तुम्हाला माहितीय का, आमिर खानची ती गौरी म्हणजेच ग्रेसी सिंग (gracy singh) आता कुठे आहे आणि कशी दिसते?
ग्रेसी सिंग (gracy singh) या एकेकाळच्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. तिने आमिर खान, अजय देवगन, संजय दत्त, अमिताभ बच्चन यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. ‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘गंगाजल’ या तिने सुपरहिट चित्रपटांमध्ये गणल्या जातात.
2001 साली ‘लगान’ हा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाला होता. मात्र, इतक्या मोठ्या यशानंतरही ग्रेसी सिंग हळूहळू चित्रपटसृष्टीतून गायब झाली. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, एका यशस्वी कारकीर्दीऐवजी त्यांनी लाईमलाइटपासून दूर राहण्याचा निर्णय का घेतला. ‘लगान’च्या वेळेस तिचं वय अवघं 20 ते 21 वर्षे होते, आणि आता ती 44 वर्षांची झाली आहे.
तरीही, 44 व्या वर्षीही ती अतिशय आकर्षक दिसतेय. ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर जाऊन तिने ‘द प्लॅनेट्स’ या डान्स ग्रुपसोबत दौरे करत एक नृत्यांगना म्हणून आपलं करिअर सुरू केलं. त्यांनी 1997 साली ‘अमानत’ या टेलिव्हिजन मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ‘लगान: वन्स अपॉन अ टाईम इन इंडिया’ या महाकाव्यात्मक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका निभावली.
‘लगान’ हा चित्रपट आशुतोष गोवारीकर यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला होता, तर आमिर खानने त्याची निर्मिती केली होती. या चित्रपटात ग्रेसीने आपल्या साधेपणा आणि निरागसतेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हा चित्रपट खूप मोठा हिट ठरला आणि ‘मदर इंडिया’ आणि ‘सलाम बॉम्बे’नंतर अकादमी पुरस्काराच्या सर्वोत्तम परदेशी भाषेतील चित्रपट श्रेणीसाठी नामांकित होणारा केवळ तिसरा भारतीय चित्रपट बनला.
ग्रेसी सिंग हिला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. मात्र, त्या आपले यश टिकवून ठेवू शकल्या नाहीत. तिने ‘अर्मान’ या चित्रपटात अनिल कपूर आणि अमिताभ बच्चनसोबत काम केलं. पण तो चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने ‘चंचल’, ‘देशद्रोही’, ‘देख भाई देख’ अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं, पण हे चित्रपटही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात आणि बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्यात अयशस्वी ठरले.
बॉलीवूडमध्ये सलग अपयश आल्यानंतर तिने तमिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती, पंजाबी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. मात्र, तिथेही त्या फार काळ टिकू शकल्या नाहीत. त्यानंतर 2013 साली ग्रेसी सिंग यांनी ‘ब्रह्माकुमारी’मध्ये जागतिक आध्यात्मिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांनी या संस्थेच्या नियमांचं पूर्णपणे पालन करायला सुरुवात केली आणि त्यांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला लागल्या.
ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये सामील झाल्यानंतर, एका जुन्या मुलाखतीत ग्रेसी सिंग म्हणाल्या होत्या की, “मला इथे अमर्याद सुरक्षितता, शांतता, आनंद, समजूत, स्वीकार आणि सहकार्य यांचा अनुभव आला. मी येथे जगभरातून आलेल्या नम्र, दयाळू आणि समंजस लोकांना भेटले.” तिला अखेरचं ‘संतोषी माँ – सुनाएं व्रत कथाएं’ या टेलिव्हिजन मालिकेत पाहण्यात आलं, जी ‘संतोषी माँ’ शोचं सिक्वेल होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























