KGF Chapter 2 : 'केजीएफ-2' आता ओटीटीवर; निर्मात्यांनी केलं 'एवढ्या' कोटींचं डील
आता लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
KGF Chapter 2 : अभिनेता यशच्या (yash) 'केजीएफ चॅप्टर 2' (KGF Chapter 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धामाकूळ घातला. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळली. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 1000 कोटींपेक्षा जास्त रूपयांची कमाई केली. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी रिलीज झाला होता.
यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त (Sanjay Dutt), रवीना टंडन (Raveena Tandon) आणि श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे राइट्स विकले आहेत.
केजीएफ-2 चित्रपटाच्या निर्मात्यांनी ओटीटी राइट्स 320 कोटींना विकले आहे. हा चित्रपट 27 मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण केजीएफ-2 हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर निर्मात्यांनी अजून प्रेक्षकांना दिलेलं नाही.
केजीएफ चॅप्टर 2 हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या केजीएफ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. केजीएफ-2 या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे.
'केजीएफ 2' च्या स्टार्सनं चित्रपटासाठी घेतले 'एवढे' मानधन
केजीएफ चॅप्टर-2 साठी यशनं 25 कोटी मानधन घेतलं आहे. चित्रपटामध्ये संजय दत्तनं अधीरा ही खलनायकाची भूमिका साकारली आहे. अधीरा ही भूमिका साकारण्यासाठी संजय दत्तनं नऊ कोटी रूपये फी घेतली. रवीना टंडन या चित्रपटात चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 1.5 कोटी फी घेतली आहे.
हेही वाचा :
- Palak Tiwari : ‘सडपातळ’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीच्या लेकीचं बेधडक उत्तर, पलक म्हणाली...
- Sanskrutik Kala Darpan Awards : सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेकडे नाट्यसृष्टीचे लक्ष; व्यावसायिक नाटकांची नामांकने जाहीर
- Trending : बालकलाकार Kailia Posey चा कार अपघातात मृत्यू; आईने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली माहिती