(Source: ECI | ABP NEWS)
KBC Junior Overconfident Contestant Boy: बिग बींसोबत उद्धटपणे बोलला, ओवर कॉन्फिडन्समुळे शेवटी तोंडघशी पडला, केबीसीतील बेशिस्त मुलाच्या वागणुकीने नेटकरी संतापले
KBC Junior Overconfident Contestant Boy: ज्यांना बॉलिवूडचा महानायक म्हणून संबोधलं जातं, त्यांच्यासमोर बसून पाच वर्षांचा चिमुकला एवढा उद्धटपणे बोलतोय, हे पाहून नेटकऱ्यांना राग अनावर झाला.

KBC Junior Overconfident Contestant Boy: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करत असलेला क्विज शो 'कौन बनेगा करोड़पति'चा (Kaun Banega Crorepati) खास सेगमेंट 'KBC ज्युनियर'मध्ये (KBC Junior) यावेळी इशित भट्ट (Ishit Bhatt) हॉटसीटवर बसलेला. इशित भट्ट हा पाचव्या इयत्तेत शिकणारा एक लहान मुलगा. पण, शोमध्ये जेव्हा संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा बिग बींसोबत उद्धटपणे वागत होता. हा एपिसोड पाहिल्यानंतर युजर्सचा पारा चांगलाच वर चढल्याचं पाहायला मिळालं. ज्यांना बॉलिवूडचा महानायक म्हणून संबोधलं जातं, त्यांच्यासमोर बसून पाच वर्षांचा चिमुकला एवढा उद्धटपणे बोलतोय, हे पाहून नेटकऱ्यांना राग अनावर झाला.
इशित गुजरातच्या गांधीनगरचा आहे. शोमध्ये येणापूर्वी कुणीच विचार केलेला नव्हता की, फक्त पाचवीत शिकणारा हा लहान मुलगा बिघडलेला आणि उद्धट असेल. अमिताभ बच्चन यांच्यासोबत तो ज्या पद्धतीनं वागत होता, ते पाहून त्यांच्या पालकांवर, त्यांच्या संस्कारांवर सर्वजण प्रश्न उपस्थित करत आहेत. सोशल मीडियावर याचा हा उद्धटपणा पाहून सर्वजण जोरदार ट्रोलिंग करत आहेत.
वीडियो देखने के बाद ऐसा कि इस बच्चे के माता पिता ने शायद संस्कार नहीं दिए
— Sabharwal (@GulshanKum6415) October 12, 2025
KBC एपिसोड में पांचवीं कक्षा में पढ़ने वाला इशित भट्ट ने अमिताभ बच्चन से बार-बार बीच में बोलते हुए 25,000 का सवाल गलत जवाब दिया और जीते हुए पैसे खो दिए.
अमिताभ बच्चन साहब ने शांत रहते हुए कहा, ज्यादा… pic.twitter.com/oqG1vpCLEW
बॉलिवूडचे महानायक आपल्या शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. पण, नुकताच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पाचवीत शिकणारा मुलगा अमिताभ बच्चन यांच्यासोबत उद्धटपणे वागताना दिसतोय. जे पाहून सारेच हैराण झालेत. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांचा राग अनावर झाला. सोशल मीडियावर या व्हिडीओवर जोरदार प्रतिक्रिया आल्या. शोमध्ये अमिताभ बच्चन बोलत असताना, हा लहान मुलगा अत्यंत उद्धटपणे वागतो, त्यांना सतत मधेमधे थांबवतो... हसत हसत विचित्र गोष्टी बोलतो, एवढंच नाहीतर 'बिग बी अंकल, आप भी तो गलती करते हो ना!'
People are hating on the kid but the real problem is the new age, emotionally fragile parents. The kind who chase 'unique' names without realizing basic phonetics. You named your kid Ishit. That literally reads 'I Shit'. The kid literally did what you wanted on the National TV. pic.twitter.com/PxC0FaTY34
— Kashmiri Hindu (@RohitInExile) October 13, 2025
युजर्सकडून जोरदार ट्रोलिंग
अमिताभ बच्चन संपूर्ण शोमध्ये अत्यंत संयमानं, शांतपणे वागताना दिसतायत. ते हसत-खेळत त्या मुलाशी बोलण्याचा, त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात आणि शोमधलं वातावरण अत्यंत हलकं-फुलकं ठेवण्याचा प्रयत्न करतात. व्हिडीओ व्हायरल होताच, सर्वांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "या मुलाला दोन थोबाडात ठेवून द्यायला हव्यात, जेणेकरुन त्याला वागण्याची योग्य पद्धत समजेल..." तर आणखी एका युजरनं म्हटलंय की, "या नव्या पिढीतल्या मुलांना मोठ्यांशी बोलण्याची पद्धत माहीत नाही..."
























