KBC Independence Day: नवा भारत, नवा विचार... KBC मध्ये दिसणार देशभक्तीचा रंग; 'ऑपरेशन सिंदूर'ची कहाणी सांगणार भारताच्या रणरागिणी
KBC Independence Day: अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती 17' सीझन 11 ऑगस्टपासून सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर प्रसारित होत आहे.

KBC Independence Day: बॉलिवूड (Bollywood News) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पुन्हा एकदा त्यांच्या लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती'सह (Kaun Banega Crorepati) टेलिव्हिजनवर परतत आहेत. 11 ऑगस्टपासून सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर हा शो प्रसारित केला जात आहे. या शोचे अनेक प्रोमो रिलीज करण्यात आले, ज्याबाबत चाहते फारच उत्सुक आहेत. शोच्या भव्य प्रीमियरनं त्याची गौरवशाली 25 वर्षे साजरी केली. आता स्वातंत्र्यदिनाच्या खास प्रसंगी, निर्मांत्यांनी एका खास पाहुण्यांना आमंत्रण धाडलं आहे. त्यामुळे 15 ऑगस्टचा एपिसोड अत्यंत रोमांचक आणि आश्चर्यकारक असणार आहे. स्वातंत्र्यदिनी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये भारतीय सैन्यातील तीन शूर महिला अधिकारी सहभागी होणार आहेत. देशाची मान अभिमानानं उंचावणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये (Operation Sindoor) सहभागी झालेल्या भारतीय सेना, वायुसेना आणि नौदलाच्या महिला अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कौन बनेगा करोडपतीच्या 17 व्या सीझनसह अमिताभ बच्चन पुन्हा एकदा टीव्हीवर दाखल होणार आहेत. केबीसीच्या नव्या सीझनमध्ये, 15 ऑगस्टच्या विशेष एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये भारतीय नौदलाच्या कमांडर प्रेरणा देवस्थळींसह ऑपरेशन सिंदूरच्या पत्रकार परिषदेचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिलांचा समावेश असेल. ज्यामध्ये भारतीय सैन्याच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंह हॉट सीटवर दिसतील.
'जबाब देना बनता है...'
स्वातंत्र्यदिनाचा स्पेशल एपिसोड केबीसीच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये तिन्ही ऑफिसर्स 'ऑपरेशन सिंदूर'बाबत सांगत असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी सांगतात की, "पाकिस्तान कुरापती करतच आलाय... तो जवाब देना बनता था..." तसेच, विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितलंय की, "पहाटे 1.5 ते 1.30 पर्यंत, आम्ही फक्त 25 मिनिटांत खेळ संपवला...". तसेच, तिघींनी बिग बींना 'ऑपरेशन सिंदूर'बाबत अनेक गोष्टी सांगितल्या. त्यासोबतच त्यांनी हेदेखील सांगितलं की, "यामध्ये कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना नुकसान पोहोचलं नाही पाहिजे... हा एक नवा भारत, नव्या विचारांसह आहे..."
View this post on Instagram
स्वातंत्र्य दिनाचा महाउत्सव
दरम्यान, 15 ऑगस्टच्या निमित्तानं देशातील तीन अधिकाऱ्यांना केबीसीमध्ये पाहणं हा एक अतिशय खास अनुभव असणार आहे. शोच्या आगामी भागाचा प्रोमो सोनी चॅनलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर रिलीज करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, या भागाला 'कौन बनेगा करोडपती'चा स्वातंत्र्य दिनाचा महाउत्सव विशेष भाग म्हटलं जातंय. केबीसी सोनी चॅनल आणि सोनी लिव्ह प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























