Actress Bhumi Pednekar Launched Water Brand: पाऊल लीटरची बाटली अन् 600 रुपये किंमत; बॉलिवूडच्या हिरोईननं सुरू केला पाण्याचा बिझनेस, गुंतवली 18 वर्षांची सगळी कमाई
Actress Bhumi Pednekar Launched Water Brand: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरनं स्वतःचा वॉटर ब्रँड लाँच केला आहे. या वॉटर ब्रँडचं नाव 'हिमालयन प्रीमियम वॉटर' आहे आणि त्याची सर्वात महागडी बाटली 600 रुपयांना विकली जातेय.

Actress Bhumi Pednekar Launched Water Brand: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्यांची लाईफस्टाईल (Lifestyle) याबाबत सर्वांनाच जाणून घेण्याची इच्छा असते. तसंच, ते फक्त अभिनयच करतात की, इतरही काही कामं करतात? असाही प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतो. पण, असे कित्येक बॉलिवूड (Bollywood Actor) सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी अभिनयासोबतच बिझनेसमध्येही आपलं नशीब आजमावलं आहे. यापैकी काही जण तर असे आहेत की, ज्यांनी बॉलिवूडमध्ये नाव कमावलंच, पण त्यासोबतच बिझनेसमध्येही कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं आहे. अनुष्का शर्मा, आलिया भट्ट यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींनी आपापले ब्रँड सुरू करुन बिझनेस क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. अशातच आता त्यांच्यापाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरनंही (Bhumi Pednekar) स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरनं स्वतःचा वॉटर ब्रँड लाँच केला आहे. या वॉटर ब्रँडचं नाव 'हिमालयन प्रीमियम वॉटर' आहे आणि त्याची सर्वात महागडी बाटली 600 रुपयांना विकली जातेय. भूमीच्या या ब्रँडच्या किमती खूप खास आहेत. या वॉटर बॉटलमध्ये 500 मिली आणि 750 मिली असे दोन आकार आहेत. भूमी पेडणेकरनं न्यूज18 ला सांगितलं की, हे स्पेशल वॉटर आहे आणि त्यासाठी तिनं तिची 18 वर्षांची बचत गुंतवली आहे. काचेच्या आणि प्रीमियम प्लास्टिक बाटल्यांमध्ये, 500 आणि 750 मिली बाटल्यांची किंमत 90 रुपयांपर्यंत कमी आहे आणि काचेची किंमत 600 रुपयांपर्यंत जाते.
View this post on Instagram
हिट हिरोईन ते बिझनेसवुमन
दरम्यान, भूमी पेडणेकर ही पहिली अभिनेत्री नाही, जिनं अभिनयासोबतच आपला बिझनेसही सुरू केला आहे. यापूर्वी दीपिका, आलिया आणि करीना कपूरसह अनेक अभिनेत्रींनी आपला व्यवसाय सुरू केलेला. आता भूमी देखील या स्टार अभिनेत्री आणि बिझनेस वुमन्सच्या यादीत सामील झाली आहे. भूमीनं बॉलिवूडमध्ये तिची 10 वर्ष पूर्ण केली आहेत. 2015 मध्ये आलेल्या 'दम लगा के हैशा' या चित्रपटात तिनं केलेल्या कामाची दखल सर्वांनी घेतली आणि तेव्हापासून भूमीता समावेश बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्रींमध्ये झाला. या चित्रपटानं भूमीला स्टार बनवलं. भूमीनं तिच्या पदार्पणाच्या चित्रपटासाठी 60 किलो वजन वाढवलेलं. या चित्रपटानंतर भूमीनं अक्षय कुमारसोबत 'टॉयलेट एक प्रेम कथा' आणि 'शुभ मंगल सावधान' मध्ये काम केलं. भूमी पे़डणेकरचे दोन्ही चित्रपट हिट झाले.
भूमीनं ओटीटीवरही केलंय पदार्पण
आतापर्यंत 26 हून अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेल्या भूमी पेडणेकरनं अलिकडेच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'रॉयल्स'मध्ये दिसलेली. यापूर्वी भूमी पेडणेकरनं ओटीटी सिनेमा 'भक्षक' मध्येही उत्तम काम केलं होतं. या चित्रपटात भूमीनं पत्रकाराची भूमिका साकारली होती, जी खूप गाजली. भूमीने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता भूमी एक व्यावसायिक महिला देखील बनली आहे. भूमीनं स्वतःचा वॉटर ब्रँड लाँच केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























