खासगी जीवनाबाबत केलेल्या वक्यव्यावरुन कतरिना कैफ हर्षवर्धन कपूरवर भडकली
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल या दोघांमध्ये नवं नातं निर्माण झालं आहे. त्यांच्या मैत्रीची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल या दोघांमध्ये नवं नातं निर्माण झालं आहे. त्यांच्या मैत्रीची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ही मैत्री आता केवळ मैत्री उरली नसून दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं आहे. या बातमीला कतरिना किंवा विकी दोघांकडूनही दुजोरा मिळालेला नाही. दोघेही याबाबत फार काही बोलत नाहीत. पण हर्षवर्धन कपूरच्या एका टिप्पणीने विकी-कतरिना एकमेकांत अडकले असण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पण हर्षवर्धनच्या एका टिप्पणीने कतरिना मात्र त्याच्यावर जबर भडकल्याची चर्चा आहे.
हर्षवर्धन कपूरने एका मुलाखतीत बोलताना त्यांच्या या नात्याबद्दल टिप्पणी केली होती. त्याला याबद्दल विचारल्यावर कतरिना आणि विकी हे दोघेही एकत्र असतात. खरं आहे ते. असं सांगून टाकलं. इतकंच नव्हे, तर या टिप्पणीमुळे मी आता गोत्यात येईन का? असंही त्याने या मुलाखतीत बोलून दाखवलं. या टिप्पणीवर कतरिना नाराज झाली आहे. खरंतर विकी आणि कतरिना आपल्या रिलेशनशिबद्दल कुठेच काहीच बोलत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी विकीची गाडी कतरिनाच्या घराच्या पार्किंगमध्ये दिसली होती. कतरिनाच्या कारच्या मागच्या बाजूला ती कुणाच्या नजरेस पडणार नाही, अशा पद्धतीने ती गाडी उभी केली होती. काही पापाराझी पत्रकारांनी ते पाहिलं होतं.
पहिल्या पावसानं निसर्ग बहरला; निर्बंध असतानाही लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
पण आता हर्षवर्धनच्या टिप्पणीने त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कतरिनाला खरंतर आपलं पर्सनल लाईफ असं जाहीर करायचं नाहीय. रणबीर कपूरसोबत नातं फाटल्यानंतर तिला बराच मनस्ताप सहन करावा लागला होता. आता आपल्या खासगी गोष्टी मीडियात येऊ नयेत असं तिला वाटतं. मिळालेल्या माहीतीनुसार हर्षवर्धनला कतरिना फारशी ओळखतही नाही. तरी ओळख असली जरी तरी त्याने तिच्या पर्सनल लाईफबद्दल बाहेर तिला न विचारता टिप्पणी करायची गरज नव्हती असा सूर कतरिनाच्या गोटात आहे. विकी आणि कतरिना दोघे डेट करत असले तरी दोघांपैकी कुणीही यावर टिप्पणी केलेली नाही.