एक्स्प्लोर

Aastad Kale On Audience: '...तुम्ही इथे येऊन आमचं नाटक करा'; नाटक सुरू असताना फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकावर भडकला आस्ताद काळे, थेट प्रयोगच थांबवला

Aastad Kale On Audience: प्रेक्षक नाटकं बघायला नाट्यगृहांपर्यंत पोहोचत आहेत, पण नाटक सुरू असताना पाळाव्या लागणाऱ्या नियमांचं काय? नाटक पाहत असताना काही नियम पाळावे, अशी माफक अपेक्षा कलाकारांची असते, पण प्रेक्षकांकडून मात्र, वारंवार सर्व नियमांचा भंग होतो. 

Aastad Kale On Audience: मराठी मनोरंजन विश्वात आता नवनवे सिनेमे (Movies), मालिका (Marathi Serials) आणि वेब सीरिज (Web Series) येत आहेत, प्रेक्षकांचाही त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पण, कितीही सिनेमे, वेब सीरिज आल्या तरी नाटकाची (Marathi Theatre) जागा मात्र, कुणीही घेऊ शकत नाही. त्यातल्या त्या मराठी नाटकांचे तर बॉलिवूड सेलिब्रिटीही (Bollywood Celebrity) फॅन आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुलाखतीत बोलताना मराठी नाटकांचा उल्लेख करुन कौतुक केलंय. सध्या मराठी नाटकांना सुगीचे दिवस आलेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कित्येक मराठी नाटकांचे प्रयोग हाऊसफुल्ल होत आहेत. प्रेक्षक नाटकं बघायला नाट्यगृहांपर्यंत पोहोचत आहेत, पण नाटक सुरू असताना पाळाव्या लागणाऱ्या नियमांचं काय? नाटक पाहत असताना काही नियम पाळावे, अशी माफक अपेक्षा कलाकारांची असते, पण प्रेक्षकांकडून मात्र, वारंवार सर्व नियमांचा भंग होतो. 

नाटक प्रत्यक्ष सादर केलं जातं, त्यामुळे ते पाहताना नाट्यगृहात शांतता पाळणं, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते.  नाटक पाहताना फोन कम्पलसरी सायलेंटवर ठेवा, फोनवर बोलू नका, आपापसांत बोलू नका, लहान बाळ रडत असेल तर त्यांना घेऊन बाहेर जा... अशा काही सूचना नाटक सुरू होण्यापूर्वीच दिल्या जातात. नाटक सुरू झाल्यानंतर कलाकारांना एकाग्र होऊन अभिनय करायचा असतो, त्यामध्ये व्यत्यय आल्यास, त्यांची लिंक तुटते आणि नाटकात व्यत्यय येऊ शकतो. पण, वारंवार सुचना देऊनही कलाकारांकडून सर्रास नियमभंग केला जातो. काहीजण तर सोयीनं याकडे दुर्लक्ष करतात. याचाच प्रत्यय एका नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच मराठी अभिनेत्याला आलाय.  

नेमकं काय घडलं?

मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे  यांच्यासोबत असाच काहीसा प्रकार घडलाय. आस्ताद काळे सध्या 'सविता दामोदर परांजपे' हे नाटक करतोय. याच नाटकाचा प्रयोग सांस्कृतिक कलादर्पणचा व्यावसायिक नाट्य महोत्सवात सादर करण्यात आला. दिलेल्या वेळेप्रमाणे नाटकाचा प्रयोग सुरू झाला. नाटक छान रंगलं होतं, पण तेवढ्याच कुणीतरी फोनवर बोलू लागलं. त्यामुळे कलाकारांचं लक्ष विचलित झालं. यावरुन मराठी अभिनेता आस्ताद काळे चिडला आणि त्यानं नाटक थांबवलं. स्टेचवरुनच त्यानं फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकाची खरडपट्टी काढायला सुरुवात केली. आम्ही तुमच्या बदली फोनवर येऊन बोलतो मग, तुम्ही इथे येऊन आमचं नाटक करा, असं आस्ताद काळे फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकाला म्हणाला.  त्यानंतर क्षणभर थांबून आस्ताद काळेनं नाटक मध्येच थांबवल्याबद्दल इतर प्रेक्षकांची माफी मागितली आणि नाटक पुन्हा सुरू केलं. आस्ताद काळेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ratna Marathi Media (@ratna_marathi_media)

ratna_marathi_media नावाच्या इन्स्टा हँडलवरुन आस्ताद काळेचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना लिहिलंय की, सांस्कृतिक कलादर्पणच्या व्यावसायिक नाट्य महोत्सवात सविता दामोदर परांजपे नाटकाचा प्रयोग माटुंगाच्या यशवंत नाट्य मंदिरमध्ये रंगला होता. प्रयोगाच्या आधी मोबाईल बंद करा असं सांगूनही प्रयोग सुरू असताना बरेचदा फोन वाजले. दरम्यान अभिनेता आस्ताद काळेचा अति संवेदनशील प्रवेश सुरू होता आणि तेवढ्यात एका प्रेक्षकाचा फोन वाजला आणि तो प्रेक्षक मोठ्याने फोनवर बोलत होता त्यावर आस्वाद काळेचा ताबा सुटला आणि त्याने प्रयोग थांबवून त्या प्रेक्षकाला चांगलंच झापलं. आणि पुन्हा प्रयोगाला सुरुवात केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prajakta Mali Post: 'फिल्म इंडस्ट्री सोडून...'; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, शिक्षिका झालीय अभिनेत्री, आता स्वतःचे वर्ग सुरू करणार

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget