![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Karan Johar : नव्या पिढीत ती धमक नाही, बॉलिवूडच्या तिन्ही खानांची जागा कोणालाच घेता येणार नाही : करण जोहर
Karan Johar : "बॉलिवूडमध्ये अभिनेता शारुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांची बरोबरी कोणालाच करता येणार नाही. नव्या पिढीतील कलाकारांमध्ये ती धमक नाही.
![Karan Johar : नव्या पिढीत ती धमक नाही, बॉलिवूडच्या तिन्ही खानांची जागा कोणालाच घेता येणार नाही : करण जोहर Karan Johar no one can replace the three Khans of Bollywood Karan Johar Sharukh Khan Salman Khan Aamir Khan Marathi News Karan Johar : नव्या पिढीत ती धमक नाही, बॉलिवूडच्या तिन्ही खानांची जागा कोणालाच घेता येणार नाही : करण जोहर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/18/93d7e500949fb13c8424feab860c7af11705577278063924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Karan Johar : "बॉलिवूडमध्ये अभिनेता शारुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांची बरोबरी कोणालाच करता येणार नाही. नव्या पिढीतील कलाकारांमध्ये ती धमक नाही. सध्याच्या कलाकारांमध्ये जुन्या कलाकारांकडे होते, तेवढे चांगले गुण नाहीत. मला वाटत नाही की, बॉलिवूडच्या तिन्ही खानांप्रमाणे सध्याच्या युवा कलाकारांमध्ये प्रतिभा नाही", असे मत बॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याने व्यक्त केलय. एका चर्चा सत्रात करण जोहर सहभागी झाला होता. यावेळी त्याने मत व्यक्त केलंय.
पुढे बोलताना करण जोहर (Karan Johar) म्हणाला, "शारुखने 2023 मध्ये कारकिर्दीतील सर्वात हिट सिनेमे केले. त्याने या सिनेमांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुपरस्टारच्या रुपाने ओळख मिळवली. नवीन कलाकरांमध्ये ही प्रतिभा नाही. कारण नवे कलाकार सिनेमा करण्यापूर्वीच जास्त विचार करतात. मी हे म्हणत नाही की, नवे कलाकार चुकतात. नवे कलाकार सिनेमापूर्वी संपूर्ण स्टोरी जाणून घेतात. पूर्ण स्टोरी जाणून घेतली, तर सिनेमात काम करायचे की, नाही? याबाबतचा निर्णय घ्यायला फार वेळ लागतो. पण, जुन्या पिढीतील कलाकारांकडून तुम्हाला लगेच उत्तर मिळतो."
दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सध्या त्याच्या 'कॉफी विथ करण' या शोमुळे चर्चेत आहे. करण त्याच्या सिनेमांबरोबरच व्यक्तीगत आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. कॉफी विथ करणमध्ये (Koffee With Karan) दीपिका आणि रणवीर आले होते. हा एपिसोड चर्चेचा विषय ठरला होता. दीपिकाने या एपिसोडमध्ये तिच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केले होते. दरम्यान, बॉलिवूडमधील तिन्ही खान लोकांचे कौतुक केल्यानंतर करण जोहर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
करण जोहरने तब्बल सात वर्षांनंतर 'रॉकी राणी की प्रेम कहाणी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. आलीया आणि रणवीरच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंप्पर कमाई केली. या चित्रपटात रणवीर आणि आलीया मुख्य भूमिकेत होते. आता करण जोहर 'कॉफी विथ करण सिझन 8' होस्ट करताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच करणने रॉकी राणी की प्रेम कहाणी नंतर एक अॅक्शन सिनेमा करणार असल्याची घोषणा केलीये. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही. दरम्यान करण जोहरने सलमानच्या वाढदिनी त्याच्यासोबत नवा सिनेमा करणार असल्याचे संकेत दिले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)