Kajol Honoured With Maharashtra State Film Awards: 'मी निशब्द...', आईची साडी नेसून काजोलनं स्विकारला पुरस्कार; अस्खलित मराठीत व्यक्त केल्या भावना VIDEO
Kajol Honoured With Maharashtra State Film Awards: बॉलिवूड अभिनेत्री काजोलला इंडस्ट्रीतील तिच्या योगदानाबद्दल स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024 नं गौरवण्यात आलं. तर, अभिनेते अनुपम खेर यांना 'स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024'नं गौरवण्यात आलं.

Kajol Honoured With Maharashtra State Film Awards: नव्वदच्या दशकापासून आजतागायत तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली, जिनं आपल्या सौंदर्यानं लाखो चाहत्यांना घायाळ केलंय, अशी गुणी अभिनेत्री म्हणजे, काजोल. मंगळवारी (काल) मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात काजोलला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मुळातच आईच्या पावलावर पाऊल टाकत इंडस्ट्रीत आलेल्या काजोलनं आजवर अनेक सुपरहिट फिल्म्स दिल्यात. काजोल, ही अभिनेत्री तनुजा यांची मोठी मुलगी. आपल्या लाडक्या लेकीला पुरस्कार स्विकारताना पाहण्यासाठी अभिनेत्री तनुजाही राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होत्या.
बॉलिवूड अभिनेत्री काजोलला इंडस्ट्रीतील तिच्या योगदानाबद्दल स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024 नं गौरवण्यात आलं. तर, अभिनेते अनुपम खेर यांना 'स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024'नं गौरवण्यात आलं. काजोलनं पुरस्कार स्विकारल्यानंतर सर्वांशी खास मराठी भाषेत संवाद साधला. तसेच, या सोहळ्यासाठी तिनं तिच्या आईची खास साडी नेसल्याचंही ती म्हणाली.
पुरस्कार स्विकारल्यानंतर काय म्हणाली काजोल?
अभिनेत्री काजोलला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानंतर काजोलनं मराठीमध्ये मनोगत व्यक्त केलं. काजोल म्हणाली की, "आज माझा वाढदिवस आहे आणि आजच्या खास दिवशी माझा सन्मान करण्यात आला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या मंचावर सगळे दिग्गज उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हे माझं भाग्य आहे. खरंतर मी निःशब्द झाले आहे, मला काय बोलावं हे सुद्धा सुचत नाहीये, हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझी आई इथे माझ्याबरोबर आलीये. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी तिची साडी नेसून आज या कार्यक्रमाला आलीये. ही माझ्या आईची साडी आहे. हा पुरस्कार यापूर्वी माझ्या आईला देखील मिळाला होता आणि आज तोच पुरस्कार मला मिळतोय यापेक्षा मोठा अवॉर्ड दुसरा काय असणार? मी सर्वांची खूप-खूप आभारी आहे. थैंक्यू"
अभिनेत्री काजोल देवगण यांना ‘स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२४’ ने सन्मानित केल्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले. #महाराष्ट्र_राज्य_मराठी_चित्रपट_पुरस्कार #Maharashtra #AshishShelar pic.twitter.com/VVyz3RbOkQ
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 5, 2025
दरम्यान, 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी भीमराव पांचाळेंचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय. तर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे. दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर आणि मुक्ता बर्वे यांचा गौरव करण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचं वितरण करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























