Jijau Song : 'सिंदखेडच्या वाटेनं' माँसाहेब जिजाऊंच्या शौर्याची गाथा; नववर्षाच्या पहिल्यादिवशीच प्रेरणादायी गाणं लाँच
Jijau Song : 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती असते. त्या पार्श्वभूमीवर सर्वांना प्रेरणा देणारं गाण प्रदर्शित करण्यात आलंय.
Jijau Song : नुतन वर्षाच्या मुहूर्तावर आज (दि.1) परभणीतील जिल्ह्यातील कलाकारांनी राजमाता जिजाऊ (Jijau Song) यांच्या जीवनावर गायलेलं प्रदर्शित करण्यात आलंय. त्यामुळे रसिक प्रेक्षकांची नव्या वर्षाची सुरुवात जिजाऊंच्या प्रेरणादायी विचारांनी झाली आहे. 'शिंदखेडच्या वाटनं गाऊ जिजाऊचं गाणं', असा या गाण्याचं नाव आहे. 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती असते. त्या पार्श्वभूमीवर सर्वांना प्रेरणा देणारं गाण प्रदर्शित करण्यात आलंय.
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या दोन्ही महापुरुषांना घडवण्याचं काम केलं. शिवाजी महाराजांचं लढाई ,युद्धनिती, शिक्षण हे राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची प्रेरणा आणि संकल्पना माँ जिजाऊ यांच्याकडूनच घेतली. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येते. दरम्यान, परभणीतील गायकांनी जिजाऊंच्या शौर्याची गाथा गाण्यातून सादर करण्याचा प्रयत्न केलाय.
जिजाऊंच्या या नव्या गाण्यात चार कलाकार एकत्र येत जिजाऊंच्या शौर्याची गाथा गात असताना दिसत आहे. माहेरच्या वाटेवरुन जाताना त्यांना शिंदखेडच्या वाटेची आठवण होते, अशी भावना महिला या गाण्यातून महिला कलाकार महिला व्यक्त करताना दिसत आहेत. कलाकारांनी जिजाऊ प्रती असलेली आपली भावना आशयपूर्वी काव्यातून मांडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला हे गाण रसिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
राजमाता जिजाऊंचं कार्य सर्व महाराष्ट्रासह राज्यातील कलाकारांना देखील प्रेरणा देणारं आहे. प्रा. कल्याण कदम यांनी हे गीत लिहिलं आणि संगीतबद्ध देखील केलं आहे. 'सिंदखेडच्या वाटेनं' हे गाणं नव कलाकार आणि गायिका असलेल्या संगीता मुळे यांनी गायलंय. दरम्यान, नवं गाणं लाँच झाल्यावर या गाण्याचा व्हिडीओ युट्युबवर शेअर करण्यात आलाय. वैष्णवी अंभोरे, योगिता राऊत, अनुजा मुकडे आणि किरण मुळे कलाकारांच्या अभिनयातून हे गाण शूट करण्यात आलंय. या गाण्याचं दिग्दर्शन बाबा डांगे यांनी केलं आहे. परभणीतील हरिष आणि प्रथम शहाणे यांनी प्रफुल्ल म्यूझिक स्टुडिओत या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं आहे. नागनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य विजय कानवटे यांच्या प्रेरणेतून हे या गाण्याची निर्मिती करण्यात प्रोत्साहन मिळालं. जिजाऊंवरील या गीताची खोपा क्रिएशनच्या आशा कल्याण कदम यांनी केलीये.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार