एक्स्प्लोर

Jessica Chastain : कोण आहे ऑस्कर विजेती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसिका चेस्टेन? जाणून घ्या तिचा आतापर्यंतचा प्रवास

Jessica Chastain : अभिनेत्री जेसिका चेस्टेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. यावेळी भाषणात तिने आत्महत्या प्रतिबंध, एलजीबीटीक्यू आणि ट्रान्स राइट्सच्या मुद्द्यावर भाष्य केले.

Oscar Awards 2022 : हॉलिवूडचा सर्वात मोठा पुरस्कार सोहळा म्हणजेच, 94 व्या अकादमी पुरस्कार 2022 (Academy Award 2022) सोहळ्याला सुरूवात झाली आहे. अभिनेत्री जेसिका चेस्टेनला (Jessica Chastain) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हा जेसिकाला मिळालेला पहिला अकादमी पुरस्कार आहे. यावेळी भाषणात जेसिकाने आत्महत्या प्रतिबंध, एलजीबीटीक्यू (LGBTQ) आणि ट्रान्स राइट्सच्या मुद्द्यावर भाष्य केले. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जेसिका चॅस्टेनला 'द आइज ऑफ टॅमी फे' (The Eyes of Tammy Faye) मधील टॅमी फेय बेकरच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. 

जेसिकानेपुरस्कार स्वीकारताना आत्महत्या प्रतिबंध आणि LGBTQ आणि भेदभावपूर्ण आणि धर्मांध कायद्याच्या पार्श्वभूमीवर ट्रान्सजेंडर अधिकारांवर भाष्य करत या समस्या देशाला झोडपून काढत असल्याचं म्हटलं आहे. जेसिका चेस्टेन ही एक अमेरिकन अभिनेत्री असून ती चित्रपटांसह दूरदर्शन आणि रंगमंचावरही झळकली आहे. ज्युलिअर्ड स्कूलमध्ये अंतिम वर्षाची विद्यार्थी असताना टिव्ही निर्माता जॉन वेल्स यांची नजर जेसिकावर पडली. तिथून जेसिकाच्या झगमगत्या दुनियेतील प्रवासाला सुरुवात झाली. जेसिकाने 2004 ते 2010 दरम्यान ER, Veronica Mars, आणि Law & Order Trial by Jury यासह अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका केल्या. 

जेसिकाला आजीने तिला नाटक पाहायला नेल्यानंतर लहानपणीच अभिनयाची आवड निर्माण झाली. तिने 1998 मध्ये अमेरिकन अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्समधून पदवी प्राप्त केली. त्याच वर्षी जेसिकाने शेक्सपिअरच्या प्रसिद्ध 'रोमिओ अँड ज्युलिएट' नाटकातून रंगमंचावर पर्दापण केले. जेसिकाने 2008 साली 'जोलेन' (Jolene) चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने स्टोलन (Stolen - 2009) सारख्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकेत झळकली.

जेसिकाला खरी ओळख 2011 साली आलेल्या 'द हेल्प' (The Help - 2011) चित्रपटापासून मिळाली. 2011 हे वर्ष चॅस्टेनसाठी यशस्वी ठरले. त्यावर्षी प्रदर्शित झालेल्या सहा चित्रपटांमुळे जेसिका प्रसिद्ध झाली. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे ब्रॅड पिट सोबत 'द ट्री ऑफ लाइफ'. जेसिकाला 'द हेल्प' चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार पहिले नामांकन मिळाले.

'द आयज ऑफ टॅमी फेय' (The Eyes of Tammy Faye -2021) या बायोपिकमध्ये तिच्या टॅमी फेयच्या भूमिकेसाठी चेस्टेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला. हा चित्रपट तिच्या स्वत:चे प्रोडक्शन हाऊस फ्रीकल फिल्म्सचा (Freckle Films) आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 December 2024Jyoti Gaikwad - Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांची बहीणीसोबत एन्ट्री,वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावलेAbu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोपSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
ईव्हीएमविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; पराभूत उमेदवाराच्या शहरातून निघेल पहिला 'मशाल मोर्चा'
Surabhi Hande : सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
सुरभी हांडे 10 वर्षांनी पुन्हा म्हाळसाच्याच भूमिकेत! 'आई तुळजाभवानी' मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री
त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!
त्यांचे लाखोंनी चाहते, भेटण्यासाठी फॅन्स झुरायचे, 'असे' चार ॲक्टर्स ज्यांच्या मृत्यूचं रहस्य कोणालाच माहिती नाही!
Embed widget