Viral Video : टॉम अॅन्ड जेरीचा खेळ... उंदराची शिकार करणाऱ्या मांजरीची फजिती, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका मांजरीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मांजर टिव्हीवर दिसणार्या उंदराची शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
Viral Video : उंदीर आणि मांजरीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मांजरी अनेकदा उंदरांची शिकार करताना दिसतात. ज्यासाठी मांजरी अनेक वेळा खटपट करताना दिसतात. अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बराच वेळ शिकारीसाठी घात धरून बसलेल्या एक मांजरीची चांगलीच फजिती होते.
उंदीर घरात घुसून खूप नुकसान करतात. कधी उंदीर महागडे कपडे कुरतडताना दिसतात तर कधी मालाचे नुकसान करताना दिसतात. यामुळे उंदरांवर उपाय म्हणून काही लोक घरात मांजर पाळतात. प्रत्येक कोपऱ्यातून मांजरी आपली शिकार उंदाराला काढून फस्त करताना अनेकदा दिसून येते.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर खरतर तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मांजर घरातील एका मोठ्या टीव्हीसमोर बसलेली आहे, यावेळी टीव्हीवर सुरु असलेल्या एका कार्यक्रमामध्ये उंदीर दाखवण्यात आला आहे. टिव्हीतील उंदराला पाहून मांजराची फजिती होते. उंदराला पाहून मांजर शिकार करण्याची तयारी करत घात धरून बसते आणि उंदीर जवळ येण्याची वाट पाहते.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टिव्हीमध्ये दिसणारा उंदीर मांजरीजवळ येताच मांजर त्याची शिकार करण्यासाठी उडी मारते. यावेळी मांजर टीव्हीवर आदळते आणि खाली पडते. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी हसू आवरत नाही आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला पाहून यूजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Happy Birthday Chitrangada Singh : मॉडेल, अभिनेत्री ते चित्रपट निर्माती... चित्रांगदा सिंहच्या सौंदर्याचे लाखो दिवाने! जाणून घ्या तिच्याबद्दलच्या खास गोष्टी...
- RRR Box Office Collection : राजामौलींच्या 'आरआरआर' सिनेमाचा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
- Oscars Awards 2022 : अँड द ऑस्कर गोज टू... लॉस एंजेलिसमध्ये रंगणार ऑस्कर सोहळा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)