जावेद अख्तर एकदा बसले की, प्यायचे 18 बॉटल बिअर , दारूच्या व्यसनापायी मोडलेला संसार, मग एक दिवस...
Javed Akhtar Used To Drink 18 Bottle Beer: जावेद अख्तर यांनी दारूच्या व्यसनाशी असलेल्या त्यांच्या लढाईबद्दल उघडपणे सांगितलं. ते म्हणाले की, ते एका वेळी एकट्यानं 18 बाटल्या बिअर प्यायचे...

Javed Akhtar Used To Drink 18 Bottle Beer At One Time: जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी नेहमीच दारूच्या व्यसनाशी असलेल्या त्यांच्या लढाईबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. तसेच, त्यांच्या दारूच्या व्यसनाचा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर कसा परिणाम झाला, हेसुद्धा त्यांनी उघड केलं आहे. अलिकडच्याच एका मुलाखतीत बोलताना जावेद अख्तर यांना तो काळ आठवला, त्यांनी सांगितलं की, ते जेव्हा एकटे असायचे, तेव्हा खूप मद्यपान करायचे. ते म्हणाले की, एक वेळ होती मी 18 बीयरच्या बाटल्या एकटा प्यायचो. मिडडेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी बीयर सोडून रम प्यायला का सुरुवात केली? हे सुद्धा सांगितलं.
जावेद अख्तर म्हणाले की, "मला व्हिस्कीची अॅलर्जी झाली. मग मी विचार केला की, मी फक्त बीयर प्यायली पाहिजे. मी एकाच वेळी 18 बाटल्या बीयर प्यायचो. मग मला वाटलं की, हे तर पोट फुगवण्याचं काम करतोय मी, मग मी बीयर पिणं सोडलं आणि रम प्यायला सुरुवात केली."
जावेद अख्तर यांना जडलेलं दारूचं व्यसन
गीतकार-लेखक यांनी खुलासा केला की, दारू पिताना त्यांना सोबत कुणी नसेल तरी चालायचं. त्यांनी सांगितलं की, "मला सोबत कुणी नसेल तरी चालायचं. कोणी असेल तर चांगलंच असायचं, नाहीतर मी एकटाच प्यायचो."
दारूच्या व्यसनामुळेच मोडलेलं पहिलं लग्न
सपन वर्मा यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी कबूल केलं की, त्यांची पहिली पत्नी हनी इराणीसोबतचं त्यांचं लग्न दारूच्या व्यसनामुळे मोडलेलं. ते म्हणाले की, "माझं पहिलं लग्न मोडल्याबद्दल मला वाईट वाटतंय. ते वाचवता आलं असतं. पण ती माझी बेजबाबदार वृत्ती होती, माझी दारू पिण्याची सवय होती... जेव्हा तुम्ही दारू पिऊन असता, तेव्हा तुम्ही कोणताही निर्णय घेता, तुम्ही अशा गोष्टींबद्दल भांडणं सुरू करता, जी अगदी शुल्लक असले. मी या सर्व चुका केल्या आहेत.
1991 मध्ये शेवटची दारू प्यायलोय
जावेद अख्तर आपल्या व्यसनाबाबत बोलताना म्हणाले की, "मी माझ्या आयुष्यात केलेल्या काही चांगल्या गोष्टींमध्ये दारू सोडणं या गोष्टीचाही समावेश आहे. मी 31 जुलै 1991 मध्ये सर्वात शेवटी दारू प्यायलो. त्यानंतर मी कधीही शॅम्पेनचा एकही घोट घेतला नाही."
दरम्यान, शबाना आझमी यांनीही जावेद अख्तर यांच्या दारूच्या व्यसनावर भाष्य केलं होतं. त्या म्हणालेल्या की, "फारच अवघड होतं ते. त्यांनी ठरवलेलं की, जर त्यांनी दारू पिणं सोडलं नाहीतर त्यांना दीर्घायुष्य लाभणार नाही आणि ते क्रिएटिव्ह काम करु शकणार नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























