एक्स्प्लोर

Paresh Rawal Hera Pheri 3: परेश रावल नेहमीच असं करतात? 2 वर्षांपूर्वी साईन केल्यानंतर सोडलेली अक्षय कुमारची 'ही' फिल्म; मागितलेली दुप्पट फी

Paresh Rawal Hera Pheri 3: परेश रावल यांनी 'OMG ओह माय गॉड'मध्ये धमाकेदार भूमिका साकारली होती.

Paresh Rawal Hera Pheri 3: अक्षय कुमार (Akshay Kumar), परेश रावल (Paresh Rawal) आणि 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) सध्या चर्चेत आहे. कारणंही तसंच आहे. राजू, श्याम आणि बाबू भैय्या हे त्रिकूट पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळवून हसवण्यासाठी सज्ज झालं होतं. पण बाबू भैय्या फेम परेश रावल यांनी तडकाफडकी चित्रपटातून एग्झिट घेतली. परेश रावल यांच्या निर्णयामुळे खळबळ माजली असतानाच, अक्षय कुमारनं त्यांना तब्बल 25 कोटींची लीगल नोटीस धाडली. हे सर्व जरी खरं असलं तरीदेखील परेश रावल यांनी अक्षय कुमारचा चित्रपट सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही परेश रावल यांनी ऐनवेळी माघार घेत अक्षय कुमारला चांगलंच गोत्यात आणलं होतं. 

गोष्ट आहे, 'OMG 2'ची. परेश रावल यांनी अक्षय कुमारच्या 'OMG 2' या चित्रपटातूनही माघार घेतली होती. परेश रावल यांनी 'OMG ओह माय गॉड'मध्ये धमाकेदार भूमिका साकारली होती. परेश रावल यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडलेली. एवढंच काय तर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही धुवांधार कमाई केलेली. पण, ज्यावेळी 'OMG 2' रिलीज झाला, त्यावेळी त्यामध्ये परेश रावल नव्हते. त्यांची जागा पंकज त्रिपाठींनी घेतलेली.  

स्क्रिप्ट आवडली नाही... परेश रावल यांचं स्पष्टीकरण 

स्क्रिप्टशी संबंधित समस्यांमुळे परेश रावल यांनी 'OMG 2' मधून माघार घेतल्याचं उघड झालं. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल म्हणाले की, "मला पटकथा आवडली नाही, म्हणून मी त्याचा भाग होऊ इच्छित नव्हतो. पहिल्या भागाचा फायदा घेण्यासाठी सिक्वेल बनवणं मला आवडत नाही, जसं आपण हेरा फेरीच्या बाबतीत केलं" .

ज्यादा फी मागितल्यामुळे मेकर्सची माघार 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जरी परेश रावल यांनी सांगितलं असलं की, OMG 2 ची स्क्रिप्ट आवडली नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली. तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश रावल OMG 2 साठी पहिली पसंती होते. मेकर्सनी त्यांच्यासोबत बातचितही सुरु केली होती. पण, अभिनेत्याचं म्हणणं होतं की, त्यांना आपल्या मार्केट वॅल्यूपेक्षा जास्त पैसे मिळाले पाहिजेत. कारण पहिल्या पार्टमध्ये ते लीड रोलमध्ये होते आणि फिल्म सुपरहिट होण्यासाठी कारणीभूत होते. पण, मेकर्सना वाटलं की, परेश रावल यांना जास्त फी दिल्यामुळे बजेट कोलमडेल, त्यामुळे त्यांनी माघार घेतली."

'हेरा फेरी 3'साठीही जास्त पैसे मागितले? 

'हेरा फेरी 3'बाबत बोलायचं झालं तर, इथेही फीबाबत काही गोष्टी समोर येत आहेत. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, परेश रावल यांनी कॉन्ट्रॅक्ट साइन केलेलं आणि सायनिंग अमाउंटही घेतली होती. पण, त्यानंतर मेकर्सकडे त्यांनी जास्त फी मागितली. त्यामुळे त्यांनी फिल्ममधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Paresh Rawal Hera Pheri 3: परेश रावल यांनी अचानक का सोडला Hera Pheri 3? समोर आलं खरं कारण, म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget