Chhaava Box Office Day 55: झुकेगा नहीं 'छावा', 'सिकंदर', 'जाट' असे कित्येक आले अन् गेले, रिलीजच्या 55 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धम्माल!
Chhaava Box Office Collection:

Chhaava Box Office Collection: नव्या वर्षात विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा'नं (Chhaava) धुमाकूळ घातला. 14 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिस (Box Office Collection) गाजवून सोडलं. 'छावा' (Chhaava Movie) थिएटरमध्ये रिलीज होऊन दोन महिने पूर्ण होतील, तरीसुद्धा हा ब्लॉकबस्टर ना थिएटरमधून हटत आहे, ना बॉक्स ऑफिसवरुन. सलमान खानचा 'सिकंदर' 'छावा'ची शिकार करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. 'सिकंदर' चौथ्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर गटांगळ्या खात असल्याचं पाहायला मिळालं.
54 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 'छावा'नं 'सिकंदर'ला तर पछाडलंच. पण, यापूर्वीच रिलीज झालेल्या भल्या दिग्गजांच्या ब्लॉकबस्टर फिल्म्सनाही पछाडलं. 'सिकंदर'नंतर आता बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा 'जाट' नुकताच रिलीज झाला आहे. अशातच 'जाट' 'छावा' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरून हटवू शकेल की, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण सध्या विक्की कौशलच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरून हटवणं खूप कठीण असल्याचं दिसून येत आहे. 54 व्या दिवसानंतर, बुधवारी 55 व्या दिवशीही चित्रपटानं आश्चर्यकारक कमाई केली आहे.
हे जरी खरं असलं, तरीसुद्धा 'छावा' आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे तशीही 'छावा'च्या थिएटरमध्या कमाईत कमालीची घट पाहायला मिळू शकते, असं बोललं जात आहे.
View this post on Instagram
55 व्या दिवशीही 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर दाखवली आपली जादू
सहसा जेव्हा एखादा मोठा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतो, तेव्हा जुन्या चित्रपटांचे शो कमी होतात, ज्यामुळे कलेक्शनमध्येही घट होते. पण, 'छावा'च्या बाबतीत असं काहीच घडलेलं नाही. कोणताही गाजावाजा न करता, अगदी शांतपणे 'छावा'नं एकामागून एक बॉक्स ऑफिसवरच्या हिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाचा वादळी वेग 55 व्या दिवशीही थांबला नाही.
Sakanlik.com मधील वृत्तानुसार, 54 व्या दिवशी 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 40 लाखांचा गल्ला जमवला. बुधवारीही 'छावा'च्या कलेक्शनमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल दिसून आला नाही. 'सिकंदर' आणि 'जाट' यांच्या उपस्थितीत 'छावा'नं 55 व्या दिवशी हिंदी भाषेत सुमारे 35 लाख रुपये कमावले आहेत. हिंदी भाषेतील चित्रपटाचं एकूण कलेक्शन 583.68 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे, तर तेलुगूमध्ये चित्रपटानं 26 दिवसांत एकूण 15.87 कोटी रुपये कमावले आहेत.
| वर्ल्डवाईड कलेक्शन | 804.85 कोटी रुपये |
| इंडिया नेट कलेक्शन | 603.35 कोटी रुपये |
| ओवरसीज कलेक्शन | 91 कोटी रुपये |
| हिंदी कलेक्शन | 583.68 कोटी रुपये |
| तेलुगु कलेक्शन | 15.87 कोटी रुपये |
'छावा'नं तेलुगू आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये एकत्रितपणे सुमारे 603.35 कोटींचं कलेक्शन केलं आहे. तर विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या ऐतिहासिक चित्रपटानं जगभरात 804.85 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटानं परदेशात एकूण 91 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'छावा'च्या कथेबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि मराठा शूर योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यामध्ये संभाजी महाराजांनी आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेबाविरुद्ध निर्भयपणे कसा लढा दिला, याचं वर्णन केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























