India Only Actress Who Worked in 130 Films: देशातील एकुलतीएक अभिनेत्री, जिनं एकाच हिरोसोबत केल्या 130 फिल्म्स, 50 हिट्स देऊन रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
India Only Actress Who Worked in 130 Films: मल्याळम सुपरस्टार प्रेम नझीरसोबत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या अभिनेत्रीच्या नावावर आहे.

India Only Actress Who Worked in 130 Films : हिंदी सिनेसृष्टी (Hindi Cinema) आणि त्यामधल्या काही गोष्टी अगदी अविश्वसनीय आहेत. अशीच एक गोष्ट आहे, एका अशा अभिनेत्रीची जिनं एकाच हिरोसोबत एक, दोन नव्हे तर तब्बल 130 फिल्म्स केल्या. फक्त एवढंच नाहीतर यामुळे तिच्या नावाची नोंद थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Guinness World Record) करण्यात आली.
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, त्या अभिनेत्रीनं सिनेसृष्टीत 60 वर्ष पूर्ण केली आहेत. पण आजही त्यांचं आकर्षण अबाधित आहे. तिनं विविध दाक्षिणात्य भाषांमधील तब्बल 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आणि ती तिच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली. याशिवाय, तिनं चित्रपटाची लेखिका आणि दिग्दर्शिका असलेली एकमेव दाक्षिणात्य अभिनेत्री बनून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ही दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री शीला सेलीन (Sheela Celine) आहे, जी शीला म्हणून प्रसिद्ध आहे. अभिनेता प्रेम नझीरसोबत शीला यांनी तब्बल 130 चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम रचला.
मल्याळी कुटुंबात जन्मलेल्या शीला यांचं पहिलं नाव सेलिन होतं. त्यांचे वडील रेल्वेत होते, त्यामुळे त्यांचं बालपण वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलं. अखेर शीला त्यांच्या कुटुंबासोबत चेन्नईमध्ये राहू लागला. शीलानं वयाच्या 17 व्या वर्षी 'पासम' (1962) या तमिळ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटात एम. जी. रामचंद्रन हे सह-अभिनेता होते. रामचंद्रन त्यांना देवी म्हणून हाक मारत असत, कारण त्यांचं नाव शीला देवी होतं. याच नावानं त्या अनेक तमिळ चित्रपटांमध्ये झळकल्या. यानंतर मात्र, काही कारणास्तव त्यांनी त्यांचं नाव बदललं आणि पुढे त्या फक्त शीला या नावानं ओळखल्या जाऊ लागल्या.
दोन दशकांपर्यंत त्यांनी मल्याळम, तमिळ, तेलगू आणि उर्दू भाषांमधील 475 चित्रपटांमध्ये काम केलं. चेम्मीन, कल्लिचेलम्मा, वेलुथा कॅथरीना अकाले, ओरु पेनिंटे काडा, सरसॅया, यक्षगानम, कुट्टी कुप्पयम, स्थानार्थी सरम्मा, कडथुनाट्टू मक्कन, कन्नपन उन्नी, ज्वाला, वाझवे मायाम हे त्यांचे लोकप्रिय चित्रपट होते. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, तिनं मल्याळम सुपरस्टार प्रेम नझीरसोबत 130 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, त्यापैकी 50 चित्रपट हिट ठरले आहेत. यामुळे दोन्ही स्टार्सच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























