एक्स्प्लोर

TV Actress Life : दोन लग्न मोडली, पोटच्या मुलीच्या कस्टडीसाठी 'या' अभिनेत्रीनं नवऱ्यालाच 93 लाखांची पोटगी दिली, ओळखलं का कोण?

TV Actress Life : इंडस्ट्रीची ग्लॅमरस, बोल्ड अन् क्लासी अभिनेत्री जिनं घटस्फोटावेळी नवऱ्याकडून नाहीतर नवऱ्याला दिलेली पोटगी. थोडी थोडकी नाहीतर तब्बल 93 लाखांची पोटगी दिलेली.

TV Actress Life : बॉलिवूड स्टार्स (Bollywood Celebrity) जेवढे त्यांच्या प्रोफेशनल लाईफसाठी (Professional Life) प्रसिद्ध असतात, तेवढेच ते त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही (Personal Life) चर्चेत असतात. अनेकदा बॉलिवूड स्टार्सच्या (Bollywood Stars) घटस्फोटाच्या बातम्या समोर येत असतात. हृतिक रोशनपासून ते सैफ अली खानपर्यंत, अनेक दिग्गज लग्नानंतर त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत राहिले. अनेक सिने कलाकारांना घटस्फोटासाठी त्यांच्या पत्नीला मोठी पोटगी द्यावी लागल्याचं आपण ऐकलंय. पण, बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील अशीही एक अभिनेत्री आहे, जिनं नेमकं याच्या उलट केलंय. घटस्फोटावेळी अभिनेत्रीनं पतीकडून पोटगी घेतली नाहीतर, पतीला भलीमोठी रक्कम पोटगी म्हणून दिली (Actress Give Alimony Of 93 Lakhs To Her Husband) आहे. ऐकून धक्का बसला ना, पण, अभिनेत्रीनं नेमकं असं का केलं? या दिग्गज अभिनेत्रीचं नाव काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात... 

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत तुम्हाला सांगत आहोत, ती अभिनेत्री म्हणजे, ग्लॅमरस, बोल्ड अन् क्लासी श्वेता तिवारी (Shweta Tiwari). टेलिव्हिजनवर 'प्रेरणा' म्हणून घराघरांत पोहोचलेल्या श्वेता तिवारीनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. मात्र, यावेळी तिचा अभिनय आणि तिचे स्टायलिश फोटो नाहीतर तिचं पर्सनल आयुष्य चर्चेचा विषय बनलं आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही धक्कादायक अनुभव तिच्या वाट्याला आले. याबाबत श्वेतानं स्वतः खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना श्वेतानं तिची दोन्ही लग्न, घटस्फोट, तिनं दिलेली पोटगी आणि तिच्या दोन्ही मुलांबाबत मोकळेपणानं भाष्य केलं आहे. 

लग्नानंतर काहीच वर्षांत घरगुती हिंसाचाराची शिकार... 

वयाची चाळीशी ओलांडलेल्या आणि दोन मुलांची आई असलेली श्वेता तिवारी आजही आपल्या क्लासी अदांसाठी ओळखली जाते. आजही श्वेता अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. श्वेता तिवारीनं 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं होतं. श्वेताचं हे लग्न इंटरकास्ट मॅरेज होतं. श्वेता तिच्या घरातील पहिली मुलगी होती, जिनं इंटरकास्ट मॅरेज केलं होता. मात्र या लग्नानंतर श्वेताच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू झाली. काही दिवस सहन केल्यानंतर श्वेतानं तिच्या आयुष्यातला मोठा निर्णय घेतला. श्वेतानं राजा चौधरीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केला. पाच वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर 2012 मध्ये श्वेता आणि राजा चौधरीचा घटस्फोट झाला. पण, या घटस्फोटासाठी पतीला नाहीतर श्वेताला फार मोठी किंमत चुकवावी लागली होती. 

अन् श्वेतानं 93 लाखांची पोटगी दिली

मुलाखतीत बोलताना श्वेतानं तिच्या घटस्फोटाबाबत खुलासा केला. श्वेता म्हणाली की, "मला पोटगी म्हणून काहीच मिळालं नाही, उलट मीच 93 लाखांची प्रॉपर्टी राजा चौधरीच्या नावावर केली. फक्त घटस्फोटासाठी." त्याचं झालं असं की, श्वेतानं आणि तिच्या पतीनं दोघांनी एकत्र एक घर घेतलं होतं, जे घटस्फोटानंतर आपल्या नावावर करावं, अशी तिच्या पतीची अपेक्षा होती. श्वेतानं सुचवलेलं की, ते घर तिची मुलगी पलकच्या नावावर केलं जावं, पण राजा चौधरीनं यासाठी स्पष्ट नकार दिला. श्वेतानं याबाबत सांगताना म्हटलं की, "मी पुरती हादरुन गेलेले, ज्यावेळी त्यानं म्हटलं की, "मुलगी नको, पण घर हवंय...". हा क्षण तिच्या आयुष्यातील एक मोठा धक्का होता. दरम्यान, श्वेता आणि राजा यांच्या घटस्फोटाच्या तडजोडीत, श्वेताला 93 लाख रुपयांचा फ्लॅट सोडावा लागला.

दुसरं लग्न केलं, पण तिथेही तेच झालं... 

राजा चौधरीपासून घटस्फोट घेतल्यानंतर श्वेताच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचा बहर आला. श्वेता आणि अभिनेता अभिनव कोहली यांच्यात प्रेम फुलंलं. प्रेमात पडल्यानंतर दोघांनी 2013 मध्ये लग्न केलं. काही काळ दोघांनीही सुखाचा संसार केला, त्यांना एक मुलगाही झाला. पण, काही वर्षांनी नात्यात मिठाचा खडा पडला. दोघांनीही काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. 

दरम्यान, श्वेता तिवारी सध्या सिंगल मदर असून ती तिच्या दोन्ही मुलांचा सांभाळ एकटी करते. काही दिवसांपूर्वीच श्वेताची मुलगी पलक तिवारीनं बॉलिवूड डेब्यू केला. याशिवाय श्वेता तिवारी अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Most Popular Actress In India: ना दीपिका, ना आलिया, ना कतरिना अन् ना प्रियांका; 'या' अभिनेत्रींनं सगळ्यांना पछाडलं, देशातील टॉप 10 अॅक्ट्रेसची यादी पाहिलीत?

महत्त्वाच्या बातम्या

Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
Samay Raina: समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात 10 लाखांचा दंड; आता पुन्हा काय झालं?
समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात 10 लाखांचा दंड; आता पुन्हा काय झालं?

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
Embed widget