Ideas of India Summit 2023 : ''मिमी'मध्ये वाढलेल्या वजनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला'; एबीपीच्या कार्यक्रमात क्रिती सेननने सांगितला 'फॅट टू फिट'चा प्रवास
Ideas of India Summit 2023 : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने आयडिया ऑफ इंडिया समिट 2023 मध्ये भाग घेतला आहे. यादरम्यान क्रिती सेननने 'मिमी' चित्रपटात वजन वाढवण्याबाबत सांगितले आहे.
Ideas of India Summit 2023 : "मिमी' चित्रपटात 15 किलो वजन वाढल्यामुळे मला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं." असं हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) म्हणाली. एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023 (Ideas of India Summit 2023) या कार्यक्रमाच्या दरम्यान ती बोलत होती. यावेळी, क्रिती सेननने तिच्या 'मिमी' या सुपरहिट चित्रपटाबद्दल चर्चा केली आहे. तसेच चित्रपटासंदर्भात अनेक किस्सेही सांगितले
'मिमी'ची भूमिका सोपी नव्हती
'मिमी'च्या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली होती'. असं म्हणत क्रिती सेनन म्हणाली की, 'चित्रपटासाठी मी 15 किलो वजन वाढवलं होतं. या दरम्यान मला खूप त्रास होऊ लागला. मला पायाचा त्रास झाला. चित्रपट संपताच लॉकडाऊन सुरु झाला. मग मी एका ऑनलाईन ट्रेनरला भेटले. त्यावेळी मी वर्कआउट्स करून स्वतःला फिट ठेवलं. लॉकडाऊन दरम्यान, मी घरून व्हर्च्युअल ट्रेनिंग घेऊन माझा 'फिट टू फॅट' प्रवास सुरू केला आणि मी माझं वजन कमी केलं. तसेच, या लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा घेत मी घरी बसून स्वत:ला फिट ठेवलं."असं क्रिती म्हणाली.
'मिमी' हा चित्रपट क्रिती सेननच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा क्रितीच्या यशात मोठा वाटा आहे.
#ABPIdeasOfIndia : मिमी के लिए जब वेट बढ़ाना पड़ा तो मुझे काफी अनफिट फील होना शुरू हुआ...: @kritisanon
— ABP News (@ABPNews) February 25, 2023
देखें https://t.co/p8nVQWYM7F पर
@panavi #NayaIndia pic.twitter.com/vbDLqrcfC9
'मिमी' हे माझ्यासाठी एक व्यासपीठ होतं : क्रिती सेनन
क्रिती सेनन म्हणाली की, एक अभिनेत्री म्हणून काम करणं, ती भूमिका योग्यरित्या निभावणं हे नेहमीच एक आव्हान असतं. पण, मिमीसारखी भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी फारच आनंददायी असते. मिमी चित्रपटात पात्राचा एक प्रवास होता. वेगवेगळे अभिनयाचे पैलू होते. हे पैलू साकारताना मला फार मजा आली. मिमी हा चित्रपट एका स्वप्नाळू मुलीची कथा होती. ही भूमिका एका मुलीची आहे. अखेर ती तिची लढाई जिंकते. त्याचप्रमाणे, मिमी हेही माझ्यासाठी एक व्यासपीठ होते.
चित्रपटसृष्टीतील नऊ वर्षांच्या करिअरबद्दल क्रिती म्हणाली...
आयडिया ऑफ इंडिया 2023 मध्ये क्रिती सेननला तिच्या नऊ वर्षांच्या फिल्मी करिअरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर क्रिती म्हणाली की, 'हिरोपंती ते शहजादा' पर्यंत नऊ वर्ष झाली आहेत. यावर माझा विश्वासच बसत नाहीये. वयाच्या पाचव्या वर्षापासून मी अभिनेत्रीचं स्वप्नं पाहिलं होतं. हे स्वप्नं जगताना मला फार छान वाटतं.
महत्त्वाच्या बातम्या :