Harshvardhan Rane Fans Pulled His Shirt During Promotion: निधी अग्रवाल, समंथा रूथ प्रभूनंतर आता 'या' अभिनेत्याला चाहत्यांच्या गर्दीनं चिरडलं; शर्च खेचला, ओढलं अन् काय-काय केलं VIDEO
Harshvardhan Rane Fans Pulled His Shirt During Promotion: थिएटर गाजवल्यानंतर आता हर्षवर्धनचा 'एक दिवाने की दिवानियात' सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आलाय. त्याच्याच प्रमोशनवेळी चाहत्यांच्या गर्दीनं हर्षवर्धनला चिरडलं.

Harshvardhan Rane Fans Pulled His Shirt During Promotion: काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटवेळी अभिनेत्री निधी अग्रवालला (Nidhhi Agerwal) चाहत्यांच्या गर्दीनं चिरडल्याचा व्हिडीओ समोर आलेला. त्या भीषण व्हिडीओनंतर (Video Viral) सोशल मीडियावर (Social Media) मोठा गदारोळ झालेला. चाहत्यांच्या गर्दीनं निधीभोवती गराडा घातलेला आणि अगदी श्वापदासारखे तिच्यासोबत वागलेले. त्यापाठोपाठ समंथा रूथ प्रभूसोबतही (Samantha Ruth Prabhu) एका प्रमोशनल इव्हेंवेळी चाहत्यांनी गैरवर्तन केलेलं. कुणी तिला धक्का दिलेला, तर कुणी तिच्या साडीचा पदर ओढलेला. अशातच आता असंच काहीसं एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्यासोबत झालंय. अभिनेत्याला गर्दीनं अक्षरशः गर्दीनं चिरडून टाकलंय. कुणी त्याचा शर्ट ओढतंय, तर कुणी त्याला ढकलतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) आणि अभिनेत्री सोनम बाजवा (Sonam Bajwa) यांचा 'एक दिवाने की दिवानियात' (Ek Deewane Ki Deewaniyat) हा सिनेमा यंदाच्या वर्षीच्या हिट सिनेमांपैकी एक. थिएटर गाजवल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आलाय. झी5 वर सर्वांना हा सिनेमा पाहता येणार आहे. याच सिनेमाच्या ओटीटी रिलीजचं प्रमोशन करण्यासाठी अभिनेता हर्षवर्धन राणे मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात दिसला. हर्षवर्धन तिथे आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि चाहत्यांच्या गर्दीनं त्याला क्षणात घेराव घातला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, हर्षवर्धन राणे त्याच्या गाडीतून उतरून चाहत्यांना भेटण्यासाठी जाताच, चाहते त्याला घेराव घालतात आणि अगदी बेशिस्तपणानं त्याच्याशी वागतात. काहींनी तर त्याचा शर्ट ओढायला सुरुवात केली. तर अनेकांनी त्याला धक्काबुक्की केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहून युजर्स भडकले
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर एका युजरनं लिहिलंय की, "काय मोठी गोष्ट आहे, तुम्ही त्याला खाऊन टाकाल??", दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "आता बॉलीवूड बदललंय, कलाकार स्वतः लोकांना भेटत आहेत..." सुदैवानं गर्दी अतिहिंसक झाली नाही आणि अभिनेत्यानंही परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली आणि तो गर्दीतून सुरक्षितपणे बाहेर पडला.
'एक दिवाने की दिवानियात' आता ओटीटीवर
'एक दिवाने की दिवानियात' सिनेमा तुम्ही ओटीटी ZEE5 वर पाहू शकता. हा सिनेमा 26 डिसेंबर 2025 पासून ओटीटीवर स्ट्रीम होईल. हर्षवर्धन आणि सोनम बाजवा व्यतिरिक्त, या सिनेमात शाद रंधावा, राजेश खेरा आणि सचिन खेडेकर यांच्यासह इतर सहाय्यक कलाकार आहेत. दरम्यान, हर्षवर्धननं 'सिला', 'कुन फया कुन' आणि 'फोर्स 3' यांसारख्या सिनेमांमधून सिनेसृष्टीत पदार्पण केलंय. यापैकी 'सिला' पुढील वर्षी 2026 मध्ये प्रदर्शित होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























