एक्स्प्लोर

Gharoghari Matichya Chuli Marathi Serial Trolled: 'ब्लाऊजवर मलमपट्टी...'; मराठी मालिकेतली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली, म्हणाले...

Gharoghari Matichya Chuli Marathi Serial Trolled: 'स्टार प्रवाह' चॅनलवर गेल्या आठवड्यात 'ठरलं तर मग' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' या दोन मालिकांचा महासंगम दाखवण्यात आला होता. या भागात दाखवण्यात आलेली चूक व्हायरल होत आहे.

Gharoghari Matichya Chuli Marathi Serial Trolled By Netizens: स्टार प्रवाहवरची (Star Pravah) एक मराठी मालिका (Marathi TV Serial) नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. सध्या टीआरपीच्या (TRP) युगात मालिकांमध्ये वेगवेगळी रंजक वळणं आणली जातात. असंच एक रंजक वळण स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेत आणलं होतं. पण, नेमकी याच वळणावर चूक झाली आणि तिच नेटकऱ्यांनी हेरली.  अशातच आता नेटकऱ्यांनी एकंदरीतच सर्वच मालिकांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. तर, हा सीन पोस्ट करत त्यावर भन्नाट कमेंट्स करून धमाल उडवून दिली आहे. 

'स्टार प्रवाह' चॅनलवर गेल्या आठवड्यात 'ठरलं तर मग' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' या दोन मालिकांचा महासंगम दाखवण्यात आला होता. मधुभाऊंच्या जीवाला धोका असल्यानं सायली तिच्या मधुभाऊंना काही दिवस जानकीकडे राहायला पाठवते. मात्र, ऐश्वर्यामुळे ही माहिती महिपतपर्यंत पोहोचते. महिपत मधुभाऊंचा माग काढतो आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी गुंडांना पाठवतो. पण, ऐनवेळी मधुभाऊंना वाचवण्यासाठी जानकी मध्ये पडते आणि तिच्या हाताला गोळी लागते. हा थरारक सीन पाहून प्रेक्षकही धास्तावले होते. यानंतर जानकी बेशुद्ध पडते, त्यानंतर  हृषिकेश तिला घेऊन डॉक्टरडे जातो. पण, त्यानंतर घडलेली एक चूक काही प्रेक्षकाच्या नजेतून सुटली आणि नेमकी तिच प्रेक्षकांनी हेरली. सध्या मालिकेतली हीच चूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rupali Mohite-jadhav (@deva_chi_aai_rupai)

नेमकं घडलं काय? 

त्याचं झालं असं की, जानकीच्या हाताला गोळी लागल्यावर डॉक्टर तिला मलमपट्टी करतात. पण, डॉक्टरांनी ब्लाऊजवरच मलमपट्टी केल्याचा सीन मालिकेत दाखवण्यात आला आहे. हा अजब सीन पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं. जखमेवर मलमपट्टी करताना, गॉझ पॅड वापरलं जातं. पण हाताला गोळी लागल्यामुळे ते हातावरच लावावं लागेल. पण, मालिकेत जानकीनं घातलेल्या ब्लाऊजवर डॉक्टर मलमपट्टी करतात. तसेच, ब्लाऊजवर गुंडाळलेल्या गॉज पॅडवर रक्ताचे डागही दाखवण्यात आले आहेत. हे पाहून "कोणता डॉक्टर ब्लाऊजवर थेट मलमपट्टी करतो?", असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. त्यासोबतच नेटकऱ्यांनी जानकीचे फोटो आण व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Gharoghari Matichya Chuli Marathi Serial Trolled: 'ब्लाऊजवर मलमपट्टी...'; मराठी मालिकेतली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली, म्हणाले...

ब्लाऊजवर मलमपट्टी करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

जानकीच्या ब्लाऊजवर डॉक्टर मलमपट्टी करत असल्याचा व्हिडीओ नटकऱ्यांकडून सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केला जात आहे. तसेच, अनेक प्रश्नही विचारले जात आहेत. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. एका युजरनं म्हटलं आहे की, "जानकीच्या ब्लाऊजला लागलं आहे की, हाताला?", दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे की, "हे पाहून वाटलंच…ब्लाऊजवर मलमपट्टी करणं कसं शक्य आहे?", आणखी एका युजरनं लिहिलंय की, "ते वेडे नाहीये आपण मालिका बघणारे दीडशहाणे आहोत...". 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sikandar Release Date: सलमान खानचा 'सिकंदर' सुपरफ्लॉप ठरणार? रिलीज डेट समोर येताच चाहत्यांना धडकी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget