Khumbeu Hat : डोक्यावर खुम्बेऊ टोपी अन् खांद्यावर पुआन शॉल; मोदींचा मिझोरमी पोशाख चर्चेत
Narendra Modi Mizoram Visit : नरेंद्र मोदींनी मिझोरममध्ये अनेक मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना डोक्यावर मिझोरमची पारंपरिक टोपी खुम्बेउ आणि खांद्यावर पुआन शॉल घेतली होती.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे देश-विदेशातील दौऱ्यांमध्ये त्यांच्या वेगळ्या पोशाखामुळे (Traditional Dress) नेहमीच चर्चेत राहतात. बहुतांश वेळा ते कुर्त्यात (Kurta) दिसतात, तर कधी सुटाबुटातही दिसतात. मात्र या वेळेस त्यांच्या मिझोरम (Mizoram) दौऱ्यातील पारंपरिक पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नरेंद्र मोदी हे मिझोरम दौर्यावर होते. त्यांनी येथील रेल्वे स्टेशनसह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. पण विशेष आकर्षण ठरली ती त्यांच्या डोक्यावरची पारंपरिक पंखांची टोपी (Traditional Hat) आणि अंगावर घेतलेला खास शाल (Shawl).
Mizoram Traditonal Dress : मिझोरमच्या पारंपरिक पोशाखात मोदी
मोदी जेथे जातात, तेथील संस्कृतीचा (Culture) सन्मान म्हणून ते स्थानिक पोशाख परिधान करतात. मिझोरममध्ये त्यांनी स्थानिक खुम्बेउ टोपी (Khumbu Hat) आणि पुआन शॉल (Puan Shawl) घालून लोकांचे मन जिंकले. साध्या पांढऱ्या कुर्त्यासोबत काळा वेस्ट-कोट आणि पुआन शॉलमध्ये नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसत होतं.
Khumbeu Hat : खुम्बेउ टोपी म्हणजे काय?
खुम्बेउ ही मिझोरमची पारंपरिक टोपी आहे. स्थानिक भाषेत हिला खुम्बेउ किंवा पुआ म्हणतात. मिझो आणि लुशाई यांसारख्या आदिवासी जमाती शुभ कार्यात आणि समारंभात ही टोपी घालतात. टोपीच्या डिझाइनमध्ये काळ्या बेसवर लाल, पांढरे आणि इतर रंगांचे पट्टे असतात. वरती काळ्या पंखांनी केलेली सजावट ही त्या जनजातीच्या सांस्कृतिक प्रतीकाचे दर्शन घडवते.
Khumbeu Hat Mizoram : खुम्बेउ टोपी कशी बनते?
ही टोपी ताज्या कापलेल्या बांबूपासून तयार केली जाते. त्यावर पारंपरिक रंगकाम आणि सजावट केली जाते. पंख किंवा रंगीबेरंगी नमुन्यांमुळे तिचा लूक अधिक उठावदार दिसतो. स्थानिक कारागिरांच्या हाताने बनवली जाणारी ही टोपी मिझोरमच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानली जाते.
Puan Shawl Mizoram : पुआन शॉलचे महत्त्व
नरेंद्र मोदींनी मिझोरमची पुआन शॉल खांद्यावर घेतला होती. पुआन किंवा पुआनचेई ही हाताने विणलेला पारंपरिक शॉल असून लग्न, उत्सव आणि धार्मिक समारंभात ती परिधान केली जाते. मिझोराममध्ये अनेक मोठ्या प्रकल्पांचा शुभारंभ करताना नरेंद्र मोदींनी ही शॉल परिधान केल्याचं दिसून आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांसाठी ईशान्य भारताच्या दौऱ्यांवर असून त्यामध्ये विकासाच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन केलं जाणार आहे.
ही बातमी वाचा:























