एक्स्प्लोर
नाकात नथ, केसांमधी गजरा, क्रांती रेडकरचा मराठमोळा साज!
क्रांती रेडकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुप्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका आणि समाजसेविका म्हणून ओळखली जाते.
Kranti Redkar
1/9

27 ऑगस्ट 1982 रोजी मुंबई येथे जन्मलेल्या क्रांतीने लहानपणापासूनच अभिनयाची आवड जोपासली. तिने मुंबईतील रामनारायण रुइया महाविद्यालयातून शिक्षण घेतल.
2/9

2000 साली 'सून असावी अशी' या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
3/9

प्रसिद्धी मिळवलेले चित्रपट: 'जात्रा', 'शिकारी', 'लापंडाव', 'नो एंट्री – पुन्हा', 'करार', 'काका' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमधून क्रांतीने तिच्या अभिनयाची छाप सोडली.
4/9

अभिनयासोबतच क्रांतीने लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.समाजकार्यातही ती सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ती सहभाग नोंदवते.
5/9

2017 मध्ये तिने समीर वानखेडे यांच्याशी विवाह केला असून त्यांना जुळ्या मुली आहेत.कुटुंब, काम आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख समतोल ती राखते.
6/9

सध्या क्रांती रेडकरने पारंपरिकतेला आधुनिकतेची सुंदर सांगड घालत केलेल्या लूकची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
7/9

तिने पिवळ्या रंगाची लाल बॉर्डर असलेली सुंदर साडी परिधान केली आहे.
8/9

पारंपरिक नथ घालून तिने आपल्या लूकला नाजूक पण लक्षवेधी उठाव दिला आहे.
9/9

हा लूक तिला एकाच वेळी देखणा आणि रॉयल आकर्षण देतो, ज्यामुळे तिच्या चाहत्यांकडून या फोटोशूटला मोठी पसंती मिळत आहे.
Published at : 13 Sep 2025 01:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























