Ghanshyam Darode Refutes Death Rumors: 'येत्या 10 दिवसांत मी स्वतःला संपवणार...'; छोटा पुढारी घनःश्याम दरोडेचा थेट पोलिसांना इशारा, प्रकरण नेमकं काय?
Ghanshyam Darode Refutes Death Rumors: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्वतःच्या निधनाच्या व्हायरल होणाऱ्या पोस्ट पाहून संतापलेल्या घनःश्याम दरोडेनं थेट श्रीगोंदा पोलीस ठाणं गाठून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Ghanshyam Darode Refutes Death Rumors: बिग बॉस मराठीचं (Bigg Boss Marathi) पाचवं पर्व विशेष गाजलं. या पर्वात मराठी कलाकारांपासून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही संधी देण्यात आली होती. या पर्वात 'छोटा पुढारी' म्हणजेच, घनःश्याम दरोडेला (Ghanshyam Darode) मोठी प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासूनच घनःश्याम सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं. घनःश्याम स्वतःचे फोटो, हटके स्टाईल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच, त्यानं अनके मराठी युट्यूब चॅनल्स आणि न्यूज चॅनल्सना मुलाखतीही दिल्या आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर छोटा पुढारी घनःश्याम दरोडेचं निधन झाल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. अशातच आता स्वतः घनःश्याम दरोडे यांनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच, यासंदर्भात पोलिसांना कठोर पावलं उचलण्याची विनंतीही केली आहे. त्यासोबतच घनःश्याम दरोडेनं पोलिसांना येत्या 10 दिवसांत अफवा पसरवण्यांवर कारवाई करा, नाहीतर मी 10 दिवसांत आत्महत्या करिन असा थेट इशारा पोलिसांना दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्वतःच्या निधनाच्या व्हायरल होणाऱ्या पोस्ट पाहून संतापलेल्या घनःश्याम दरोडेनं थेट श्रीगोंदा पोलीस ठाणं गाठून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोन सोशल मीडिया चॅनेलवरून त्याच्या विरोधात जाणीवपूर्वक बदनामी करणारे व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप छोटा पुढारीनं तक्रारीमध्ये केला आहे.
छोटा पुढारी घनःश्याम दरोडे नेमकं काय म्हणाला?
"नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरवडे. मी जे काही आहे तुमच्या आशीर्वादामुळेच आहे. पण, मित्रांनो, काय होतंय समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीचे लोक आणि विरोधक ज्यांचं मला नाव गाव काहीच माहीत नाही. ते माझ्या मागे का लागलेत? मी त्यांचं काय वाईट केलंय? हे माहीत नाही. पण ते माझं वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाने तर मला जिवंतपणे मारलं. त्यातही मी त्याला म्हटलं की मी शेतकऱ्याचा पुत्र आणि तू पण शेतकऱ्याचा पुत्र आहेस. माझ्या चाहत्यांची माफी माग. तर तो म्हणतो की तुझा चाहता वर्ग माझ्यापेक्षा मोठा नाही. त्यामुळे मी माफी मागणार नाही".
View this post on Instagram
"दुसरी गोष्ट म्हणजे कायम ट्रोलिंग करणं, मी जे काम करतो त्यावर वाईट कमेंट करणं, याला मी कंटाळलेलो आहे. माझ्या शरीरावर तुम्ही बोलताय. आणि माझ्या आईवडिलांना तुम्ही बोलताय. म्हणजे जन्माला येऊन मी चूक केली का असं वाटतंय. तर मी आता श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. आणि सांगितलं आहे की जर 10 दिवसांत काही झालं नाही. आणि त्या मुलांचं अकाऊंट बॅन झालं नाही. माझी नुकसान भरपाई दिली नाही. तर येत्या 10 दिवसांत मी आत्महत्या करणार आहे. कारण, मी आता कंटाळलेलो आहे. माझ्या घरचेसुद्धा कमेंट वाचतात. त्यामुळे यांचा सोक्षमोक्ष लागला नाही तर मी 10 दिवसांत आत्महत्या करेन"
महत्त्वाच्या इतर बातम्या :























