Shefali Jariwala Death: 'माझी विनंती, ड्रामा करू नका...'; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीनं माध्यमांसमोर हात जोडले, काय म्हणाला? VIDEO
Shefali Jariwala Death: पराग त्यागीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये पराग त्यागी माध्यमांना हात जोडून मला एकट्याला सोडा... अशी विनंती करतोय.

Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' म्हणून प्रसिद्ध झालेल्या शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. शनिवारी, 28 जून रोजी ओशिवरामधल्या स्मशानभूमीत शेफालीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफालीनं अचानक या जगाचा निरोप घेतला आणि अख्खी सिनेसृष्टी हळहळली. आपल्या लाडक्या बायकोला गमावल्यानंतर तिचा पती पराग त्यागी (Parag Tyagi) मात्र, पुरता कोसळल्याचं पाहायला मिळालं. शेफालीच्या निधनानंतर पराग त्यागीचा एक व्हिडीओ समोर आला होता, व्हिडीओमध्ये तो त्याच्या कुत्र्यासोबत दिसतोय. त्यावेळी बायको गेलीय आणि इथे हा कुत्रा फिरवतोय, असं म्हणत नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता. अशातच आता शेफालीच्या पतीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पराग त्यागी सुजलेल्या डोळ्यांनी माध्यमांना आवाहन करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पराग त्यागी पुरता खचल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये त्यानं रडत रडतच, अगदी सुजलेल्या डोळ्यांनी माझ्यमांना एक भावनिक आवाहन केलंय. शेफालीचा पती पराग त्यागीनं माझ्यमांना हात जोडून विनंती केलीय आणि म्हटलंय की, माझी तुम्हाला विनंती आहे. याची खिल्ली उडवू नका, अजिबात ड्रामा करू नका, प्लीज माझ्या परीसाठी (शेफालीसाठी) प्रार्थना करा. शांतपणे... आता कृपया हे सर्व थांबवा..."
शेफालीच्या नवऱ्याचं हात जोडून माध्यमांना आवाहन
पराग त्यागीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये पराग त्यागी माध्यमांना हात जोडून मला एकट्याला सोडा... अशी विनंती करत आहे. शेफालीच्या मृत्यूनंतर ज्यावेळी पराग त्यागी शेफालीच्या शवविच्छेदनानंतर रुग्णालयात गेला, तेव्हा त्यानं तिथं उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सना त्याला एकटं सोडण्याची विनंती केली. त्यानंतर पराग त्याच्याच सोसायटीच्या आवारात त्याचा कुत्रा सिंबाला फिरवताना दिसला, त्यावेळी पराग दिखावा करत असून बायकोच्या जाण्यानं याला अजिबात दुःख झालं नसल्याचंही तो म्हणाला. त्यानंतर रश्मि देसाईनं पराग त्यागीची बाजू घेत, त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं आहे.
View this post on Instagram
पती, वडील आणि बहिणीनं केले शेफालीवर अंत्यसंस्कार
पराग त्यागीनं त्याच्या सासऱ्यांसोबत म्हणजेच, शेफालीचे वडील आणि तिच्या बहिणीसोबत शेफाली जरीवालावर अंत्यसंस्कार केले. पत्नीच्या जाण्यानं परागवर दुःखाचा डोंगर कोसळल्याचं पाहायला मिळत होता. बऱ्याच काळापासून धीर धरून वावरणारा शेफालीचा नवरा पराग त्यागी तिला अखेरचा निरोप देताना मात्र धायमोकलून रडताना दिसला. रडून रडून तर शेफालीच्या आईची अवस्था अत्यंत वाईट झालेली. आपल्या डोळ्यांदेखत ती माऊली आपल्याच मुलीवर अंत्यसंस्कार होत असल्याचं पाहताना पुरती कोसळली होती. शेफालीच्या जाण्यानं तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारही अस्वस्थ झालेले. नववधूसारख्या सजलेल्या आपल्या पत्नीला निरोप देताना पराग त्यागी खचून गेलेला. तो तिच्या पार्थिवाच्या बाजूलाच बसलेला. शेफालीला अखेरचा निरोप देताना त्यानं तिच्या डोक्यावरुन हात फिरवला, तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि आपल्या आसवांना वाट मोकळी करुन दिली.
अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल, पोस्टमार्टमधून काय समोर?
शेफाली जरीवालाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात असले तरी, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कारण राखीव ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, शेफालीचं शवविच्छेदन करण्यात आलं. पण, तिच्या मृत्यूचं कारण मात्र, अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























