एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Marathi Movie Update : स्पृहा जोशीचं मोठ्या पडद्यावर कमबॅक, आदिनाथसोबत झळकणार 'शक्तिमान' सिनेमात; प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचंही पदार्पण 

Marathi Movie Update : प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

Marathi Movie Update : अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही काही दिवसांपूर्वीच 'सुख कळले' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिची ही मालिका प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळतंय. पण मागच्या काही काळात स्पृहा सिनेमांपासून लांब असल्याचं चित्र होतं. मोरया, मला काहीच प्रोब्लेम नाही, पेईंग घोस्ट, पैसा पैसा यांसारख्या सिनेमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर तिचा 2022 मध्ये कॉफी हा शेवटचा सिनेमा आला होता. त्यानंतर आता स्पृहा पुन्हा तिचं दमदार कमबॅक करणार आहे. 'शक्तिमान' या सिनेमातून स्पृहा आदिनाथ कोठोरेसोबत (Addinath Kothare) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

“शक्तिमान“ चित्रपटातून दिग्दर्शक प्रकाश कुंटे आपल्याला काय नवा संदेश देणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातील बालकलाकार ईशान कुंटे याचे चित्रपटातील पदार्पण असून हा दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा मुलगा आहे. मुख्य म्हणजे  चित्रपट शूट होत असताना केवळ तो 6 वर्षांचा होता . शक्तिमान हा सर्वांच्या परिचयाचा आहेच. पण आता त्या शक्तिमानचे आणि आदिनाथच्या शक्तिमानचे काय कनेक्शन आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

'शक्तिमान' सिनेमाविषयी

हा नक्की कोणत्या धाटणीचा  चित्रपट आहे हे अजूनही समजले नाही. पण या सिनेमाची टॅगलाईन, नाव आणि  एक हसमुख कुटुंब  यामुळे प्रेक्षकांच्या मनातही प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत  आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी यांच्यासह प्रियदर्शन जाधव, ईशान कुंटे आणि विक्रम गायकवाड यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले असून निर्मिती मोशनस्केप एन्टरटेनमेंटने केली आहे . 

24 मे रोजी सिनेमा होणार प्रदर्शित

हा सिनेमा येत्या 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अर्थात आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी , प्रियदर्शन जाधव, अशा मराठीतील नामांकित कलाकारांच्या अभिनयाने सजलेला एक उत्कृष्ट मराठी चित्रपट पाहण्याची संधी मराठी प्रेक्षक नक्कीच सोडणार नाहीत. 'कॉफी आणि बरंच काही', 'अँड जरा हटके' ,'हंपी' आणि 'सायकल' सारख्या गाजलेल्या दर्जेदार  चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी या नवीन सिनेमाविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या सिनेमाचा ट्रेलरही लवकरच लॉन्च होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

ही बातमी वाचा : 

Kareena Kapoor Khan : करिना कपूर कायदाच्या कचाट्यात, स्वत:च्या पुस्तकाच्या नावात बायबलचा उल्लेख, कोर्टाकडून नोटीस जारी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget