एक्स्प्लोर

Ergaal : मरिआई या दुर्लक्षित जमातीवर भाष्य करणारा चित्रपट, दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात 'इरगाल'ने पटकावला पुरस्कार!

Ergaal : दिल्लीत झालेल्या बाराव्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात रशीद उस्मान निंबाळकर दिग्दर्शित 'इरगाल' चित्रपटाला बेस्ट फिल्म ज्युरी अॅवॉर्डचा मानकरी ठरला.

Ergaal Marathi Movie : दिल्लीत झालेल्या बाराव्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात रशीद उस्मान निंबाळकर दिग्दर्शित 'इरगाल' चित्रपटाला बेस्ट फिल्म ज्युरी अॅवॉर्डचा मानकरी ठरला. महोत्सवातील 718 चित्रपटांतून ‘इरगाल’ (Ergaal) चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला असून, महाराष्ट्रातील मरिआई या दुर्लक्षित जमातीवर हा चित्रपट बेतला आहे. आता लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मरिआई ही दुर्लक्षित जमात आहे. धर्मग्रंथात किंवा वाङ्मयात त्याबाबत उल्लेख आढळत नाही. डोक्यावर मरिआईचा गाडा, गळ्यात ढोलकं आणि चाबूक घेऊन हा समाज ऋतूप्रमाणे वर्षातील आठ महिने पोटासाठी भटकंती करत असतो. भटकंती दरम्यान कुठे ही मुले जन्माला येतात, तर काहींचा दुर्दैवी मृत्यू देखील होतो. मात्र, अज्ञान व शिक्षणाच्या अभावामुळे मरीआई जमातीच्या जन्म-मृत्यूची नोंद शासनदप्तरी होत नाही. आज समाज जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, रेशन कार्ड आधार कार्ड साठी झगडताना दिसतो. मात्र, मरिआई हा समाज अंधश्रद्धेच्या जोखडात बांधला गेला‌. समाजातील बोटावर मोजण्याइतपत तरुण मुलं शिक्षणाकडे वळल्यामुळे त्यांच्यात थोडीफार जागृती झाली आहे. मात्र शिक्षणामुळे या समाजाचा अंधकारमय जीवनात प्रकाश किरण येऊ शकतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

मरिआई समाज जवळून अनुभवलेले लेखक!

चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक रशीद निंबाळकर स्वतः मरिआई समाजाचा एक घटक आहेत. रशीद निंबाळकर यांनी वायसीएम मुक्त विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अँड व्हिडीओ टेक्नॉलॉजी पुणे येथे प्रवेश घेतला. त्यांच्या ‘डुमरू’ या लघुपटाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, दिल्ली येथे विशेष उल्लेख पुरस्कारासाठी निवडण्यात आलं होतं.

अंधश्रद्धा आणि जाचक रूढी परंपरामुळे अनेक जाती जमाती विकासापासून कोसो मैल दुर आहेत. मरिआई हा त्यापैकी एक समाज आहे. मरिआई समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘इरगाल’ हा चित्रपट केल्याचं रशीद निंबाळकर यांनी सांगितलं.

अग्निपंख प्रोडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी यांनी ‘इरगाल’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. रशीद उस्मान निंबाळकर यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचं छायांकन केशव गोरखे, संगीत दिग्दर्शन डॉक्टर जय-भीम सूर्यभान शिंदे, संकलन प्रशांत नाईक यांनी केलं आहे. राम पवार, राहुल चवरे, रशीद उस्मान निंबाळकर, सृष्टी जाधव, उषा निंबाळकर, दामोदर पवार, महादेवी निंबाळकर, स्वप्नाली बोडरे, स्वप्नाली तूपसुंदर, आप्पासाहेब खांडेकर, मस्के सर, अभिनंदन गवळी, साहेबराव जाधव, भारत निंबाळकर, शरणाप्पा बंडगर, शैला गायकवाड आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा :

PHOTO : ब्युटी इन ब्लॅक, कान्सच्या रेड कार्पेटवर तमन्ना भाटियाचा जलवा!

Sriya Lenka: ऑडिशन दिली, ऑनलाईन कोरियन भाषा शिकली, भारताची पहिली के-पॉप स्टार ठरली श्रिया लेंका!

Hrithik Roshan, KGF 3 : ‘केजीएफ 3’मध्ये हृतिक रोशनची वर्णी? वाचा काय म्हणाले मेकर्स...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणारZero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?Zero Hour Guest Centre Ganesh Sawant | नारायणगडावर दसरा मेळावा, जरांगे मराठ्यांचे नेते होणार का?Zero Hour Guest Centre Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरेंचा रोख नेमका कुणावर असणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget