Hrithik Roshan, KGF 3 : ‘केजीएफ 3’मध्ये हृतिक रोशनची वर्णी? वाचा काय म्हणाले मेकर्स...
Hrithik Roshan : चित्रपटाच्या तिसऱ्या भागात हृतिक रोशन यशसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Hrithik Roshan : दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या (Yash) KGF 2 चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. दुसऱ्या भागाच्या यशानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली होती की ते लवकरच चित्रपटाचा तिसरा भाग (KGF 3) प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. आता असे म्हटले जात आहे की, केजीएफच्या तिसऱ्या भागासाठी निर्मात्यांनी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनशी (Hrithik Roshan) संपर्क साधला आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात हृतिक रोशन यशसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बातमी समोर आल्यापासून या दोन स्टार्सना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
आता KGF च्या निर्मात्यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. KGF च्या प्रोडक्शन हाऊस Hombale Films चे सह-CEO विजय किरांगदूर यांनी एका मुलाखतीत हृतिकला कास्ट करण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या वर्षी KGF चॅप्टर 3 केला जाणार नाही असे त्याने म्हटले आहे.
लवकरच कलाकारांना फायनल करू!
या चित्रपटाच्या पुढील भागाबद्दल बोलताना निर्माते विजय किरांगदूर म्हणाले की, KGF च्या तिसऱ्या भागाचे काम यावर्षी सुरू होणार नाही. यश आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील सध्या त्यांच्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. यासोबतच यश आणि प्रशांत नील जेव्हा त्यांच्या कामातून मोकळे होतील, तेव्हा ते दोघेही या चित्रपटावर काम सुरू करतील, असेही त्यांनी सांगितले. या चित्रपटाची तारीख ठरल्यानंतर सर्व कलाकारांची निवड केली जाईल. यासोबतच या चित्रपटाचे काम कधी सुरू होणार हे या चित्रपटाच्या तारखेवर अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.
हृतिक विषयी बोलताना विजय म्हणाले की, ‘जेव्हा आम्ही तारखा फायनल करू, तेव्हाच स्टारकास्टचाही विचार करू. त्यानंतरच बाकीच्या कलाकारांना फायनल करू. यासोबतच चित्रपटासाठी कोणाकडे वेळ आहे हेही बघायला हवे. सर्व काही त्यावरच अवलंबून आहे.’
केजीएफ 2चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
KGF 2 हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटामध्ये यश सोबत संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये यावर्षी 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
हेही वाचा :
Swatantra Veer Savarkar : रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला!