लातूरमध्ये "अभिजात शॉर्ट फिल्म फेस्टिवल" देशविदेशातील लघुपटांची मेजवानी!
Abhijaat short film festival : लातुरात प्रथमच देशविदेशातील लघुपटांची मेजवानी होणार असून लघुपट, अनिमेशन, डॉक्युमेंटरी म्युजिक व्हिडिओ, भारतातील आणि परदेशातील शॉर्ट फिल्म्स पाहण्याची मेजवानी लातूरकरांना मिळणार आहे.
![लातूरमध्ये Entries open for Abhijaat short film festival 2024 Entries documentary animationfilm videosong musicvideo Abhijaat Film Society Latur लातूरमध्ये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/1e7309504f3f1e5a4c4cbc1b5884de70173253002863694_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर मध्ये अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने प्रथमच 'शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल'
आयोजित केला जात आहे. यानिमित्ताने विविध विषयांवर तयार झालेली भारतातील आणि परदेशातील
शॉर्ट फिल्म्स पाहण्याची मेजवाणी लातूरकरांना मिळणार आहे.
हा महोत्सव डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणार असून,
आजपर्यंत 130 पेक्षा अधिक लघुपटांचा सहभाग या फेस्टिव्हल मध्ये झाला आहे!
हा महोत्सव डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून यानिमित्ताने
विविध विषयांवर तयार झालेल्या भारतातील आणि परदेशातील शॉर्ट फिल्म्स पाहण्याची मेजवानी लातूरकरांना मिळणार आहे.
असा असेल "अभिजात शॉर्ट फिल्म फेस्टिवल"
शॉर्ट फिल्म, डोक्युमेंटरी, अॅनिमेशन, विडियो सॉन्ग या चार भागांत हा महोत्सव विभागण्यात आला आहे.
यासाठी 4 डिसेंबर ही आपल्या कलाकृती पाठविण्यासाठी अंतिम तारीख असणार आहे.
त्यानुसार आजपर्यंत 130 पेक्षा अधिक लघुपट दाखल झाली असल्याची माहिती सोसायटीच्या वतीने मिळाली आहे.
त्यात अमेरिका, नेदरलँड, जर्मनी अशा देशांतून शोर्त्फ फिल्म्स मिळाल्या आहेत.
या शॉर्ट फिल्म्स पैकी निवडक फिल्म्स महोत्सवाच्या दरम्यान दाखवण्यात येणार
असून प्रेक्षकांना त्याचा मोफत आस्वाद घेता येणार आहे.
महोत्सवात होणार बक्षिसांची उधळण!
महोत्सवातिल पहिले पारितोषिक 21,000 रुपयांचे आहे,
दुसरे 15,000 तर तिसरे पारितोषिक 11,000 रुपयांचे असणार आहे.
याशिवाय विविध विभागांसाठी स्वतंत्र पारितोषिक असणार आहेत.
इथे कराल नोंदणी!
या महोत्सवात आपल्या कलाकृती समाविष्ट करण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंकचा वापर करण्याचं
आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
अधिकृत वेबसाईट-
www.abhijaatfilms.org/sff-24/
फिल्म फेडेरेशन अंतर्गत संलग्न असलेल्या अभिजात फिल्म सोसायटीने आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत.
त्यात 'लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' यामध्येही 'अभिजात' सह-आयोजकच्या भूमिकेत राहिला आहे.
त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता 'अभिजात' तर्फे लघुपट महोत्सव आयोजित केला गेला आहे.
लातूरमध्ये गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत असणार्या 'अभिजात फिल्म सोसायटी'च्या
वतीने यंदा प्रथमच 'शॉर्ट फिल्म फेस्टिवल' आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चित्रपट कसा पहावा याबाबत विविध उपक्रम घेऊन चित्रपट कलेबाबत समाजात अभिरुची
वाढविण्यासाठी 'अभिजात फिल्म सोसायटी' कार्यरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)