Entertainment News Live Updates 9 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'विक्रम वेधा' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!
लेखक-दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'विक्रम वेधा' चित्रपटाचा ट्रेलर आज (8 सप्टेंबर) कलाकारांच्या हस्ते मुंबईतील विशेष कार्यक्रमात लाँच करण्यात आला.
थँक गॉडमधील अजयचा लूक रिलीज
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अजय त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. आता लवकरच त्याचा थँक गॉड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील अजयचा लूक रिलीज करण्यात आला आहे. अजयनं सोशल मीडियावर थँक गॉड चित्रपटातील त्याच्या लूकचा फोटो शेअर करुन या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत माहिती दिली आहे.
'विक्रम वेधा'च्या ट्रेलरचे पाच तासात पाच मिलियन व्ह्यूज
बहुप्रतिक्षित 'विक्रम वेधा' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्पावधीतच ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेलरला पाच तासाच पाच मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 'विक्रम वेधा'च्या ट्रेलरला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'विक्रम वेधा' या सिनेमात सैफ अली खान विक्रमच्या भूमिकेत आहे. तर, हृतिक रोशन वेधाच्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ट्रेलरमधील लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
'राडा' सिनेमाचा ट्रेलर आऊट
फुल्ल ऑफ अॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर हवा करण्यास सज्ज झाला आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर आणि सिनेमातील एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
हंसल मेहताच्या 'लुटेरे'चा टीझर आऊट
सिनेनिर्माता हंसल मेहताची 'लुटेरे' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा टीझर आऊट करण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये अनेक विषयांवर भाष्य करण्यात आलं आहे. 'लुटेरे' ही वेबसीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Black Adam Trailer : ड्वेन जॉनसनच्या 'ब्लॅक अॅडम'चा दमदार ट्रेलर रिलीज
Black Adam Trailer : अभिनेता ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) गेल्या अनेक दिवसांपासून 'ब्लॅक अॅडम' (Black Adam) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा दुसरा ट्रेलर आऊट झाला आहे. 'ब्लॅक अॅडम'चा ट्रेलर खूपच रोमांचक आहे.
View this post on Instagram
Suriya 42 Mostion Poster : सूर्याच्या आगामी सिनेमाची घोषणा
Suriya 42 Motion Poster Released : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या (Suriya) प्रत्येक सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. अशातच सूर्याच्या आगामी 'सूर्या 42' (Suriya 42) या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या सिनेमाचं मोशन पोस्टरदेखील रिलीज करण्यात आलं आहे.
We seek all your good wishes as we begin our adventure!https://t.co/18rEmsLxom #Suriya42 @directorsiva @ThisIsDSP @DishPatani @iYogiBabu @vetrivisuals@kegvraja @StudioGreen2 @UV_Creations
— Suriya Sivakumar (@Suriya_offl) September 9, 2022
Brahmastra Leaked Online : 'ब्रम्हास्त्र'ला करावा लागतोय पायरसीचा सामना
Brahmastra Leaked Online : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहेत. आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण आता या सिनेमाला पायरसीचा सामना करावा लागत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे.
क्वीन एलिझाबेथ यांच्यावर आधारित 'The Crown' वेब सीरिजच्या सहाव्या भागाचे शूटिंग थांबणार, निर्मात्याचे संकेत
ब्रिटनच्या क्वीन एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांच्या निधनानंतर आता 'The Crown' या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजच्या सहाव्या भागाचे शूटिंग थांबवण्याची शक्यता आहे. या वेब सीरिजचे लेखक आणि निर्माते पिटर मॉर्गन (Peter Morgan) यांनी हे शूटिंग थांबणार असल्याचे संकेत दिले आहेत. पण यावर नेटफ्लिक्सने (Netflix) अद्याप कोणतेही निवेदन प्रकाशित केलं नाही. प्रिन्सेस डायना यांच्या अपघाती मृत्यूनंतरच्या घटनांवर या सीझन आधारित आहे.
Honey Singh : 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंह पत्नी शालिनीपासून विभक्त
Honey Singh Divorced : आपल्या गाण्यांनी आणि रॅपने प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय गायक 'यो यो हनी सिंह'चा (Yo Yo Honey Singh) घटस्फोट झाला आहे. 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंहने पत्नी शालिनीसोबत घटस्फोट घेतला आहे. 2021 साली हनी सिंहवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावण्यात आला होता.