एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 9 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 9 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Shubhangi Tambale: मराठमोळी अभिनेत्री शुभांगी तांबळेचा पार पडला साखरपुडा; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Shubhangi Tambale: अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देतात. नुकतीच एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं एक खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री  शुभांगी तांबाळेनं (Shubhangi Tambale) नुकतेच तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन शुभांगीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

शुभांगीनं तिच्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. शुभांगी आणि करण मेहता यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला.  सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शुभांगी हिरवा लेहंगा, स्टोनची ज्वेलरी आणि हतात हिरव्या बांगड्या अशा लूकमध्ये दिसत आहे.  शुभांगीनं या फोटोंना "माझ्यासोबत घडलेली सर्वात चांगली गोष्ट' असं कॅप्शन दिलं आहे. अनेकांनी फोटोला कमेंट करुन शुभांगीच्या लूकचं कौतुक केलं आहे. 

Dnyaneshwar Mauli: 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत अवधूत गांधी साकारणार संत नामदेव यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाले...

Dnyaneshwar Mauli: 'ज्ञानेश्वर माउली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूपदर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं.  प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका संताचा प्रवेश होणार आहे. 

Adipurush: आदिपुरुषच्या टीझरवर अभिनेते अरुण गोविल यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'धर्माची चेष्टा करू नका'

Adipurush: सध्या  'आदिपुरुष' (Adipurush)  हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत. आता रामानंद सागर यांची मालिका 'रामायण' मध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे. 

17:50 PM (IST)  •  09 Oct 2022

Indian Idol 13: इंडियन आयडॉलमधील या स्पर्धकाचा फॅन झाला विराट कोहली; केला खास मेसेज

Indian Idol 13: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'चा 13 वा (Indian Idol 13) सीझन सुरू झाला आहे. या कार्यक्रमामधील स्पर्धकांच्या आवाजाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच या कार्यक्रमाच्या स्पर्धकांनी केवळ सामान्य लोकांची नाही तर सेलिब्रिटींची देखील मनं जिंकली आहेत. शनिवारी (8 ऑक्टोबर) एका एपिसोड दरम्यान कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणनं स्पर्धक ऋषी सिंहला (Rishi Singh) क्रिकेटर विराट कोहलीनं (Virat Kohli) केलेल्या खास मेसेजबाबत सांगितलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

16:05 PM (IST)  •  09 Oct 2022

Goodbye Box Office Day 2: बिग बी आणि रश्मिकाच्या गुडबायची जादू बॉक्स ऑफिसवर नाहीच; दुसऱ्या दिवशी कमावले 'एवढे' कोटी

Goodbye Box Office Day 2:  रिपोर्टनुसार, 'गुडबाय' या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी जवळपास 1.2 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या शनिवारी (8 ऑक्टोबर) या चित्रपटानं 1.5 कोटींचे कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केलं आहे. दोन दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 2.7 कोटींची कमाई केल आहे. रविवारी हा चित्रपट चांगली कमाई करु शकतो, असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

15:18 PM (IST)  •  09 Oct 2022

Urvashi Rautela: उर्वशी रौतेला पोहोचली ऑस्ट्रेलियाला; नेटकरी म्हणाले, 'ऋषभ पंतच्या मागे गेली..'

Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील सोशल मीडिया वॉर नेहमीच चर्चेचा विषय ठरला. उर्वशी आणि ऋषभ यांच्या नात्याची चर्चा देखील जोरदार रंगली होती. आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालाय. या स्पर्धेत भारतीय संघ त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. आता नुकतीच उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे आता अनेक नेटकरी उर्वशीला ट्रोल करत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

13:30 PM (IST)  •  09 Oct 2022

Vivek Agnihotri,Sharad Pawar: विवेक अग्निहोत्रींची शरद पवारांवर टीका; म्हणाले, 'त्यांनी आयुष्यभरात...'

Vivek Agnihotri,Sharad Pawar: कलेच्या क्षेत्रात अल्पसंख्याकांच्या योगदान लक्षणीय आहे. त्यामागे उर्दू भाषेचा योगदान महत्वाचं आहे. आज आपण बॉलिवूडमध्ये पाहतो, तर बॉलिवूडमध्ये मुस्लिमांचा योगदान नाकारता येणार नाही, असं शरद पवार  (Sharad Pawar) यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं. आता शरद पवार  यांच्या या वक्तव्यावर अनेक जण टीका करत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Sharad Pawar) यांनी एक ट्वीट शेअर करुन शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

12:52 PM (IST)  •  09 Oct 2022

36 Gunn : सुधीर आणि क्रियाचे ‘36 गुण’ जुळणार? पाहा संतोष जुवेकरच्या नव्या चित्रपटाचा टीझर

36 Gunn: लग्न ही आयुष्यातील अत्यंत तरल, हळूवार आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट. लग्नामुळे दोन मनांसह दोन कुटुंबांची सुंदर नात्यामध्ये बांधणी होत असते. नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार घेऊन दिग्दर्शक समित कक्कड यांच्या '36 गुण' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. येत्या 4  नोव्हेंबरला '36 गुण' चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं
लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं
Maharashtra Assembly Election 2024 : संजय राठोडांविरोधात ठाकरे गट 'बंजारा कार्ड' खेळणार? 'या' महंतांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
संजय राठोडांविरोधात ठाकरे गट 'बंजारा कार्ड' खेळणार? 'या' महंतांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Pune Car Accident: कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! आलिशान कारनं दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, 3 जखमी
कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! आलिशान कारनं दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, 3 जखमी
Ram Shinde vs Rohit Pawar : 'माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा', राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
'माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा', राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRatan Tata Funeral : नेते मंडळी ते बॉलिवूड, टाटांना निरोप देण्यासाठी कोण-कोण हजर?Ajit Pawar Cabinet : मंत्रिमंडळ बैठकीतून वाॅकआऊट दादांची नाराजी?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 11 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं
लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं
Maharashtra Assembly Election 2024 : संजय राठोडांविरोधात ठाकरे गट 'बंजारा कार्ड' खेळणार? 'या' महंतांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
संजय राठोडांविरोधात ठाकरे गट 'बंजारा कार्ड' खेळणार? 'या' महंतांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Pune Car Accident: कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! आलिशान कारनं दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, 3 जखमी
कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! आलिशान कारनं दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, 3 जखमी
Ram Shinde vs Rohit Pawar : 'माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा', राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
'माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा', राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal :   येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
येवला विधानसभा मीच लढणार, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण, कारण सांगत म्हणाले..
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
Ajit Pawar left Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांबाबत अजितदादा नाराज, 10 मिनिटांत  बैठक सोडली? अजित पवार म्हणाले....
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांबाबत अजितदादा नाराज, 10 मिनिटांत बैठक सोडली? अजित पवार म्हणाले....
Ajit Pawar: धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार 10 मिनिटांत उठून गेले
धडाधड निर्णय, खटाखट योजनांची घोषणा; पण अजितदादा मंत्रिमंडळ बैठकीतून 10 मिनिटांत उठून गेले
Embed widget