एक्स्प्लोर

Pune Car Accident: कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! आलिशान कारनं दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, 3 जखमी

Pune Car Accident: कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना समोर आली आहे, यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात  गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना समोर आली आहे, यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मध्यरात्री 01.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलिशान कारने MH12 NE 4464 पहिल्यांदा एक्टिवावरील तिघांना धडक दिली.या घटनेमध्ये ते तिघे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पुढे एक्सेस गाडीवरून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने चालक रौफ अकबर शेख गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना नोबल हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक दारुच्या नशेत असल्याची प्रथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघात झाल्यावर चालक भरधाव वेगात कार घेऊन पळून गेला. या अपघातात रौफ अकबर शेख या दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला आहे. या आलिशान कारच्या चालकाने २ दुचाकींना धडक दिली यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. 

तर अपघात करणारा कारचालक या घटनांनंतर फरार झाला होता. अपघात झालेल्या परिसरातील सीसीटिव्हीच्या माध्यमातून कारचा  नंबर काढण्यात आला, त्यानंतर त्या कारचालकाचा मोबाईल नंबर काढून त्यावरून पत्ता मिळवण्यात आला आहे. या अपघाच प्रकरणातील कारचालकाचे नाव आयुष प्रदीप तयाल (वय 34 वर्षे रा. हडपसर) याला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 

याप्रकरणी कलम 105,281, 125(a), 132 119,177,184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलिस करत आहेत. पोलिसांनी अपघात झालेल्या परिरातून सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहनाचा क्रमांक प्राप्त करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर पुन्हा एकदा हिट अँड रनच्या वाढत्या घटनांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वीही कल्याणी नगर परिसरामध्ये अशीच हिट अँड रनची घटना घडली होती. ज्यामध्ये अल्वपयीन मुलाने एका तरुण आणि तरुणीला उडवले होते. त्यानंतर ही घटना राज्यासह देशभरात चर्चेत आले होती, अशातच पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेने संताप व्यक्त केला जातोय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Fake Crop Insurance Issue:  महाराष्ट्रात बोगस विम्याचं भरघोस पीकMumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामधील अपघातानंतर राजकीय ओरोप-प्रत्यारोपांचं सत्रMumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यातील बस अपघाताला जबाबदार कोण? ड्रायव्हर की 'बेस्ट'?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 7 PM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget