एक्स्प्लोर

Ram Shinde vs Rohit Pawar : 'माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा', राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या तोंडावर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

अहिल्यानगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. विधानसभेच्या तोंडावर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे.   

रोहित पवारांची राम शिंदेंवर टीका 

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. मुंबईला गेल्यानंतर माणूस गोरा कसा होतो हे मला माहिती नाही. आता तर कहरच झालाय. माझं वय 38 मी युवाच आहे. मात्र माझ्या विरोधकांनी (राम शिंदे) वीस लाख रुपये देऊन कन्सल्टंट घेतल्याचं कळालं आणि कन्सल्टंटला सांगितलं की, रोहित पवारांची कॉपी करायची. पण, माझे केस आहेत. मी केस काळे करत नाही, मला लपवाछपवी जमत नाही. वीस लाख रुपये दिलेल्या त्या कन्सल्टंटने त्यांना (राम शिंदे) सांगितलं की, तुम्हाला युवा दिसावं लागेल, तुमचे केस काळे करावे लागतील. तर त्यांनी लगेच केस काळे केले. कपडे देखील युवकांसारखे घालावे लागतील. तर घालायला लागले असं म्हणत रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. 

राम शिंदेंचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

या टिकेला आता भाजप आ. राम शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. रोहित पवार यांना मतदारसंघातील प्रश्न आता कळून चुकलेत, आता ते थेट माझ्या लुकवर बोलू लागलेत. पण मी ग्रामीण भागातला खेडूत माणूस आहे. आता कपडे कोणते घालावेत तर मी पॅन्ट शर्टच घालतोय. त्यांनी माझ्या लुकवर बोलायला सुरुवात केली याचा अर्थ त्यांना इतर कोणतेही प्रश्न शिल्लक राहिलेले नाहीत. माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं हे त्यांनी जनतेला सांगावं, असं राम शिंदे यांनी म्हटले आहे.

शरद पवारांचा राम शिंदेंना टोला

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम शिंदे यांना टोला लगावला होता. त्यांनी म्हटलं होतं की,  उभं करायला अक्कल लागते. पण उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही. रोहित पवार (Rohit Pawar) चांगले काम करत आहे. त्याला मदत करता आली नाही तर त्याच्या कामात खोडा घालू नका असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अप्रत्यक्षपणे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर निशाणा साधला होता. 

आणखी वाचा 

Gopichand Padalkar : शरद पवार आणि रोहित पवारांची अवस्था फरड्या सापासारखी : गोपीचंद पडळकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरीZero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget