Entertainment News Live Updates 5 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
परवानगी असूनही ‘आयफा 2022’साठी दुबईत पोहचू शकली नाही रिया चक्रवर्ती
Rhea Chakraborty IIFA 2022: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakraborty) अबुधाबीला जाण्याचे स्वप्न भंगले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेली रिया चक्रवर्ती 2 जून ते 5 जून या दरम्यान अबूधाबीमध्ये आयोजित ‘आयफा’ (IIFA 2022) पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार होती. कोर्टातून जामिनावर सुटलेली रिया चक्रवर्ती हिने ‘नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स’ (NDOS) अंतर्गत परदेश प्रवासासाठी कोर्टाची परवानगीही घेतली होती. पण, तरीही ती अबुधाबीला जाऊ शकली नाही.
ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्याने रिया चक्रवर्तीवर 2020पासून परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर रियाने आयफा अवॉर्ड सोहळ्यासाठी कोर्टात अर्ज करून परवानगी मागितली होती. अभिनेत्रीने पासपोर्ट परत मिळवण्यासाठी आणि परदेशात जाण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तिला काही अटी शर्थींसह परवानगी दिली होती. पण, रिया चक्रवर्ती विरुद्ध लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आल्याने तिला परदेशात जाता आलेले नाही. परदेश प्रवासासाठी अर्ज दाखल करताना, रिया चक्रवर्तीच्या विरोधात एजन्सीने जारी केलेल्या लुकआउट नोटीसबद्दल तिला माहिती नव्हती.
ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला कोर्टाने जामिनावर सोडले होते. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्याने तिला 2020पासून परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ती आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खूप उत्साहित होती. त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज करून अबुधाबीला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, तिला लुकआऊट नोटीसबाबत कोणतीही माहिती नव्हती. अशा परिस्थितीत ती परवानगी मिळूनही देश सोडून कुठेही जाऊ शकली नाही.
केके यांचं शेवटचं गाणं 'धूप पानी बहने दे' सोमवारी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
गायक केके (KK) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके यांची अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केके यांनी गायलेलं शेवटचं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग रविवारी झाले होते. केके यांचं शेवटचं गाणं ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
शाहरुख खानला कोरोनाची लागण
देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरची बर्थडे पार्टी कोरोना स्प्रेडर असल्याचे म्हटले जात आहे. आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh कोरोनाची लागण झाली आहे. फिल्मफेअरने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
Man Udu Udu Zhala : दीपू कोमातून बाहेर येण्यासाठी इंद्रा देणार अग्निपरीक्षा; रंगणार एक तासाचा विशेष भाग
'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेत सध्या दीपूचा गंभीर अपघात झाला आहे.सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतला आहे. पण मालिकेच्या आगामी भागात दीपू कोमातून बाहेर येणार आहे. दीपू कोमातून बाहेर येण्यासाठी इंद्रा अग्निपरीक्षा देणार आहे.
कमल हसनच्या 'विक्रम'ने केली रेकॉर्डब्रेक कमाई; दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार
कमल हासनचा (Kamal Haasan) 'विक्रम' (Vikram) सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांतच या सिनेमाने जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने रिलीज आधीच 200 कोटींची टप्पा पार केला होता.
Major Box Office Collection Day 2 : बॉक्स ऑफिसवर 'मेजर'ची संथ सुरूवात
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार महेश बाबूच्या (Mahesh Babu) प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या मेजर (Major) या चित्रपटाला रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. या चित्रपटाचे कथानक हे NSG कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे तर हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं संथ गतीनं सुरुवात केली आहे.