Entertainment News Live Updates 30 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 May 2022 10:21 PM
टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, अमेरिकेत विकेंडला केली 1129 कोटींची कमाई

टॉम क्रूझचा (Tom Cruise) 'टॉप गन मॅव्हरिक' (Top Gun Maverick) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमाने अमेरिकेत विकेंडला 1129 कोटींची कमाई केली आहे.

'सरसेनापती हंबीरराव'ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात; तीन दिवसांत रचला इतिहास

प्रविण तरडेंचा (Pravin Tarde) 'सरसेनापती हंबीरराव'(Sarsenapati Hambirrao) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या सिनेमाने 8.71 कोटींची कमाई केली आहे. 

सिनेमागृहात बायोपिकचा दबदबा; 'धर्मवीर'ने केली 22.58 कोटींची कमाई

महाराष्ट्रात सध्या 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' (Dharmaveer mukkam post thane) या सिनेमाचाच बोलबाला आहे. 13 मे रोजी हा सिनेमा  तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले आहेत. आतापर्यंत या सिनेमाने 22.58 कोटींची कमाई केली आहे. 

सिनेमाचे तिकीट दाखवा अन् मोफत आंबे मिळवा; 'सरसेनापती हंबीरराव' सिनेप्रेमींसाठी खास योजना

 प्रविण तरडेंचा (Pravin Tarde) 'सरसेनापती हंबीरराव'(Sarsenapati Hambirrao) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशातच एका प्रेक्षकाने या सिनेमासाठी एक खास ऑफर ठेवली. 

'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात अक्षय कुमार पृ्थ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे नाव बदलण्यात आले आहे. आता सिनेमाचे नाव बदलल्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज केला आहे. 

'अनन्या' सिनेमा 22 जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बहुचर्चित अनन्या (Ananya) हा सिनेमा आता 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) अनन्या हे पात्र साकारत आहे. हा सिनेमा आधी 11 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण नंतर या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता हृताने सोशल मीडियावर या सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 

प्रवीण तरडेंनी मानले प्रेक्षकांचे आभार, केतकी चितळेचेही कान टोचले

कलाकार सोशल मीडियावर त्यांची राजकीय मतं मांडत असतात. यामुळे ते अनेकदा ट्रोलदेखील होत असतात. यासगळ्यावर 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी (Pravin Tarde) अखेर भाष्य केलं आहे. चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कोणत्याच कलाकाराने राजकीय भूमिका घेऊन नयेत, असे प्रवीण तरडे म्हणाले. 

'भूल भुलैया 2'ची उत्तुंग भरारी; दुसऱ्या विकेंडलाही कमवला कोट्यवधींचा गल्ला

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर रिलीजच्या दुसऱ्या विकेंडला या सिनेमाने 30 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट; दीपू येणार कोमातून बाहेर

'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेत सध्या दीपूचा गंभीर अपघात झाला आहे.सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतला आहे. पण मालिकेच्या आगामी भागात दीपू कोमातून बाहेर येणार आहे. 

‘या’ कारणामुळे कृष्णा अभिषेकला बदलावे लागले नाव!

Krushna Abhishek Birthday : अभिनेता-कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आज (30 मे) त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. लोक त्याला कॉमेडियन, डान्सर, अॅक्टर आणि अँकर म्हणून चांगले ओळखतो. पण, आज पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या कृष्णा अभिषेकचे आयुष्य इतके सोपे नव्हते. कृष्णा अभिषेकच्या जन्मानंतर अवघ्या 2 वर्षात त्याच्या आहीचे निधन झाले होते. इथपासून सुरु झालेला त्याचा हा संघर्ष मनोरंजन विश्वात स्थिरावण्यापर्यंत सुरूच होता. इतकेच नाही तर, अभिनेत्याला त्याचे नाव देखील बदलावे लागले होते.


वाचा संपूर्ण बातमी

Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठीने गर्दीत एका व्यक्तीला लगावली कानशिलात; सांगितलं कारण

दिव्यानं मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझ्यासोबत एक घटना घडली. ही घटना एका थिएटर बाहेर घडली. त्यावेळी सिंगल स्क्रिनचे तिकीट ब्लॅकनं विकलं जात होतं. त्यामुळे थिएटर बाहेर खूप गर्दी होती. मी तिकीट विकत घेण्यासाठी लाइनमध्ये थांबले होते. तेव्हा गर्दीचा गैरफायदा घेऊन एका व्यक्तीनं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. '


वाचा सविस्तर बातमी

जाणून घ्या आयुष्मानच्या अनेक चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

अनेक चित्रपटानं शनिवारी 2-3 कोटींची कमाई केली. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटानं आत्तापार्यंत चार कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेट 40 कोटी होते. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 1.75  कोटींची कमाई केली.


वाचा सविस्तर बातमी

'स्वत:ला पंजाबी म्हणायची लाज वाटते'; सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर मिका सिंहकडून पोस्ट शेअर

Sidhu Moosewala : मिका सिंहची पोस्ट


'मी नेहमी म्हणतो की मला पंजाबी असल्याचा अभिमान आहे पण आज मला तेच सांगताना लाज वाटते. अवघ्या  28 वर्षांचा एक तरुण हुशार मुलगा, खूप लोकप्रिय आणि त्याच्यासमोर उज्ज्वल भविष्य असलेला  सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. मी पंजाब सरकारला विनंती करतो की कृपया या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा. ' असं मिकानं पोस्टमध्ये लिहिलं आहे. तसेच त्यानं सिद्धूसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. फोटोला मिकानं दिलेल्या या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 





दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात 'इरगाल'ने पटकावला पुरस्कार!

Ergaal Marathi Movie : दिल्लीत झालेल्या बाराव्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात रशीद उस्मान निंबाळकर दिग्दर्शित 'इरगाल' चित्रपटाला बेस्ट फिल्म ज्युरी अॅवॉर्डचा मानकरी ठरला. महोत्सवातील 718 चित्रपटांतून ‘इरगाल’ (Ergaal) चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला असून, महाराष्ट्रातील मरिआई या दुर्लक्षित जमातीवर हा चित्रपट बेतला आहे. आता लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Happy Birthday Paresh Rawal : विनोदीच नाही तर, खलनायक साकारुनही गाजवला मोठा पडदा!

Paresh Rawal Birthday : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांचा आज (30 मे) वाढदिवस आहे. आज ते त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अभिनेते परेश रावल यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे. परेश रावल हे असे कलाकार आहेत, जे कोणत्याही भूमिकेत स्वत:ला अगदी फिट बसवतात. त्यांची हेरा फेरीतील ‘बाबूराव’ची व्यक्तिरेखा असो किंवा ओह माय गॉडमधील ‘कांजीभाई’, त्यांनी साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखा लोकांच्या मनात घर करून आहेत. केवळ विनोदी अभिनेता नाही तर, खलनायक बनूनही त्यांनी मोठा पडदा गाजवला.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेन्ण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


आमिर खानचा 'मास्टरपीस' लाल सिंह चड्ढाचा ट्रेलर प्रदर्शित


Laal Singh Chaddha Trailer : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात आमिर खान एका पंजाबी सरदारच्या भूमिकेत दिसत आहे. आमिरसोबत करीना कपूरदेखील (Kareena Kapoor) या सिनेमात  महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.


आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात लाल सिंह चड्ढा नावाच्या व्यक्तीचा जीवनप्रवास दाखवला आहे. या सिनेमात आमिरने अनेक भूमिका साकारल्याचे ट्रेलरवरून दिसते आहे. ट्रेलरच्या शेवटी आमिर पळताना दिसतो आहे. आमिर का पळतोय हे प्रेक्षकांना सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेल.


'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल टी-20 च्या अंतिम सामन्यात या सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमादरम्यान सिनेमातील आमिर खानसह सिनेमातील अनेक कलाकार स्टेडियममध्ये उपस्थित होते.


अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयपीएल 2022 च्या फायनलचा थरार सुरू आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावाच्या दुसऱ्या टाइन आऊटवेळी आमिर खान याच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.