एक्स्प्लोर

Happy Birthday Krushna Abhishek : मनोरंजन विश्वात स्थिरावण्यासाठी केला संघर्ष, ‘या’ कारणामुळे कृष्णा अभिषेकला बदलावे लागले नाव!

Krushna Abhishek Birthday : कृष्णाची आई अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन होती. त्यामुळे जेव्हा बिग बींनी आपल्या मुलाचे नाव अभिषेक ठेवले, तेव्हा कृष्णाच्या आईनेही मुलाचे नाव अभिषेक ठेवले होते.

Krushna Abhishek Birthday : अभिनेता-कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आज (30 मे) त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. लोक त्याला कॉमेडियन, डान्सर, अॅक्टर आणि अँकर म्हणून चांगले ओळखतो. पण, आज पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या कृष्णा अभिषेकचे आयुष्य इतके सोपे नव्हते. कृष्णा अभिषेकच्या जन्मानंतर अवघ्या 2 वर्षात त्याच्या आहीचे निधन झाले होते. इथपासून सुरु झालेला त्याचा हा संघर्ष मनोरंजन विश्वात स्थिरावण्यापर्यंत सुरूच होता. इतकेच नाही तर, अभिनेत्याला त्याचे नाव देखील बदलावे लागले होते.

कृष्णाची आई अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन होती. त्यामुळे जेव्हा बिग बींनी आपल्या मुलाचे नाव अभिषेक ठेवले, तेव्हा कृष्णाच्या आईनेही मुलाचे नाव अभिषेक ठेवले होते. कृष्णा अभिषेकचे खरे नाव अभिषेक शर्मा होते.

का बदलले नाव?

कृष्णा जेव्हा इंडस्ट्रीत आला, तेव्हा त्याला नाव कमवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मनोरंजन विश्वात आल्यापासून त्याची ओळख केवळ अभिनेता गोविंदाचा पुतण्या इतकीच राहिली होती. तर, दुसरीकडे अभिषेक बच्चन देखील मनोरंजन विश्वात त्याचे स्थान बळकट करत होता. यामुळे कृष्णाला इंडस्ट्रीत स्थान मिळवण्यासाठी नाव बदलावे लागले. कृष्णाने आपल्या संघर्षाने मनोरंजन क्षेत्रात ठसा उमटवला.

सुरुवातीला कॉमेडियनचे नाव ‘Krishna’ असे होते, जे एका प्रसिद्ध ज्योतिषाच्या सल्ल्याने बदलून ‘krushna’ करण्यात आले. कृष्णा अभिषेकने 2017 मध्ये अभिनेत्री कश्मीरा शाहशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले देखील आहेत.

कॅन्सरमुळे गमावले आई-वडील

कृष्णाच्या आईला गर्भाशयाचा कर्करोग होता. यामुळेच त्याच्या जन्मानंतर दोन वर्षातच त्याचे मातृछत्र हरपले. मात्र, याच कर्करोगाने त्याचे पितृछत्रही हिरावून घेतले. कृष्णाच्या वडिलांना देखील कॅन्सर झाला होता. कृष्णा जेव्हा ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या शोमध्ये काम करत होता, तेव्हा त्याच्या वडिलांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. 8 महिने या आजाराशी सामना केल्यानंतर त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला. याचदरम्यान त्याच्यावर कामाचीही मोठी जबाबदारी होती. या जबाबदारीमुळेच वडिलांच्या निधनानंतर काहीच दिवसांत त्याला शूटिंगला परतावे लागले होते.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Shashank ketkar Zee Marathi Serial: झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
Aai Tuljabhavani Colors Marathi: उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget