(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Entertainment News Live Updates 24 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एनसीबीने रिया चक्रवर्तीविरुद्ध न्यायालयात दाखल केले आरोपपत्र, शौविक चक्रवर्तीचे नावही सामील
Rhea Chakraborty : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा ड्रग्जच्या अँगलने तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुख्य आरोपी म्हणून रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक (Showik) आणि आणखी काही लोकांना मुख्य आरोपी बनवले आहे. आता या प्रकरणात एनसीबीने रिया, शौविक आणि इतर आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यावेळी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती देखील न्यायालयीन कामासाठी तिथे उपस्थित होते. NCB ने रिया, शौविकसह आणखी काही लोकांवर सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप केला आहे.
विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी सांगितले की, आरोपपत्रात सर्व आरोपींचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरोपपत्राचा मसुदा दाखल करताना त्यांनी सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि शौविक यांनी ड्रग्जचा वापर केला होता आणि त्यांनी सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केले होते.
विशेष सरकारी वकील म्हणाले की, न्यायालय सर्व आरोपींवर आरोप निश्चित करणार आहे. सुनावणीदरम्यान रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती कोर्टात हजर होते. ते म्हणाले की, दोषमुक्तीच्या याचिकांवर निर्णय झाल्यानंतरच आरोप निश्चित केले जातील, असे न्यायालयाने म्हटले आहे. बुधवारी रिया आणि शौविकसह अन्य आरोपी न्यायालयात हजर झाले होते. विशेष न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 जुलै रोजी होणार आहे.
सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती जवळपास महिनाभर तुरुंगात होती, त्यानंतर तिला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. परंतु, अद्यापपर्यंत एजन्सी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. रिया व्यतिरिक्त, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर अनेकांवर देखील अंमली पदार्थांचे सेवन, साठा आणि पैसे पुरवल्याबद्दल या प्रकरणात आरोप लावण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतांश आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.
Lucky Ali : 'आय लव्ह उद्धव...विषय संपला'...राजकीय घडामोडींवर लकी अली यांची पोस्ट चर्चेत
Lucky Ali : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच शिंदे आणि ठाकरे गटाबद्दल (Uddhav Thackeray) आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी गायक लकी अलीची (Lucky Ali) पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'भूल भुलैया 2'च्या यशाने भूषण कुमार भारावला; कार्तिक आर्यनला दिली महागड्या कारची भेट
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या यशाने निर्माता भूषण कुमार (Bhushan Kumar) भारवला आहे. त्याने कार्तिकला एक महागडी कार भेट दिली आहे.
Sarsenapati Hambirrao : सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाचव्या आठवड्यातही उसळतेय गर्दी
'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. आता या सिनेमाने पाचव्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे.
27 जूनला डिस्कव्हरीवर होणार 'वुमन लाइक हर'चा प्रीमियर
'वुमन लाइक हर' या कार्यक्रमाचा प्रीमियर 27 जूनला डिस्कव्हरीवर होणार आहे. चार विविध क्षेत्रातील महिलांच्या प्रेरणादायी कथा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाची नव्याने ओळख प्रेक्षकांना होणार आहे.
मन्नतमध्ये खोली भाड्याने घेऊ शकतो का? शाहरुखने दिला भन्नाट रिप्लाय
शाहरुखने चाहत्यांसाठी 'आस्क एसआरके' या सत्राचे आयोजन केलं होतं. या सत्रात चाहत्यांनी शाहरुखला व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक प्रश्न विचारले. दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला मन्नतमधील एका खोलीच्या भाड्याबद्दल विचारले. या प्रश्नाला उत्तर देत किंग खानने ट्वीट केलं आहे की;"30 वर्षांची मेहनत लागेल." शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला अनेकांसाठी एक पर्यटन स्थळ आहे. 'मन्नत' पाहण्यासाठी शाहरुखचे अनेक चाहते लांबून लांबून येत असतात.