एक्स्प्लोर

Sarsenapati Hambirrao BO Collection : ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड, 11 दिवसांत विक्रमी कमाई!

Sarsenapati Hambirrao : 'सरसेनापती हंबीरराव' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. इतिहासाचं सुवर्ण पान उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Sarsenapati Hambirrao Movie : ‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’ अशी गर्जना ऐकून आली आणि प्रेक्षकांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली होती. नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांनी या चित्रपटात ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला आहे.

'सरसेनापती हंबीरराव' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. इतिहासाचं सुवर्ण पान उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 18.20 कोटींची कमाई केली आहे. प्रविण तरडेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रविण तरडेंनी पोस्ट लिहित म्हटले, ‘अजुनही सरसेनापती चित्रपटगृहात पाय रोवून उभे आहेत .. भेटला नसाल तर भेटून या ईतिहास तुमची वाट पहातोय. ज्यांनी सहकुटुंब सिनेमा चित्रपटगृहात जावून पाहीलाय हे दैदिप्यमान यश त्यांना समर्पित!’

प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात स्वतः प्रविण तरडे यांनी हंबीररावांची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेता गश्मीर महाजनी याने ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘छत्रपती संभाजी महाराज’ अशी दुहेरी भूमिका साकारली आहे. अभिनेत्री श्रुती मराठेने साकारलेली ‘महाराणी सोयराबाईं’ची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. तर, काही चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत.

अनेक कलाकारदेखील हा चित्रपट आवर्जून बघत असून, त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

संबंधित बातम्या :

Sarsenapati Hambirrao : सिनेमाचे तिकीट दाखवा अन् मोफत आंबे मिळवा; 'सरसेनापती हंबीरराव' सिनेप्रेमींसाठी खास योजना

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी मानले प्रेक्षकांचे आभार, केतकी चितळेचेही कान टोचले

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget