एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Entertainment News Live Updates 20 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 20 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.        

बिग बॉस 16 चा स्पर्धक साजिद खान विरोधात तक्रार देण्यासाठी शर्लिन चोप्रा पोलिस स्टेशनमध्ये दाखल

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' द्वारे आपलं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. चार वर्षांनंतर तो पुन्हा इंडस्ट्रीत येण्याचा विचार करत  असताना त्याच्या शोमध्ये जाण्याबाबत अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली होती. आता अभिनेत्री शर्लिन चोप्राने साजिद खानविरोधात लैंगिक छळाचा आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.

'आदिपुरुष' चित्रपट निर्माता ओम राऊतला भूषण कुमार यांच्याकडून खास गिफ्ट; किंमत ऐकून व्हाल अवाक्!

प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) हा सध्या त्याच्या आदिपुरुष (Adipurush) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेल्या VFX मुळे अनेकांनी या ट्रेलरला ट्रोल केलं. या चित्रपटात सैफ अली खान (Saif Ali Khan), प्रभास (Prabhas) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी ओम राऊतला लग्झरी कार गिफ्ट केली आहे.

हॉरर अन् कॉमेडीचा तडका! वरुण धवन-क्रिती सेननच्या ‘भेडिया’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेननची (Kriti Sanon) जोडी पहिल्यांदाच 'भेडिया' (Bhediya) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. त्यानंतर, या चित्रपटातील वरुण धवन आणि क्रिती सेननचे पोस्टर्सही रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये वरुण धवन ‘भेडिया’ अर्थात लांडग्याच्या खतरनाक अवतारात दिसला, तर 'मिमी' फेम अभिनेत्री क्रिती सेननच्या पूर्णपणे वेगळ्या लूकनेही चाहत्यांना खूप प्रभावित केले होते. आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे.

'कोण आहेत ही माणसं? यांना कामधंदे नाहीत का?'; अफवा पसरवणाऱ्यांचे वर्षा दांदळे यांनी टोचले कान

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. वेगवेगळ्या मालिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. 2021 मध्ये वर्षा यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना दुखापत झाली. पण काही काळ ब्रेक घेतल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्या पुन्हा सज्ज झाल्या. सध्या त्या नवा गडी नवं राज्य या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या मालिकेत त्या राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती. 'वर्षा दांदळे या अंथरूणाला खिळून आहेत' अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. या अफवा पसरवणाऱ्यांना आता वर्षा यांनी चांगलंच सुनावलं आहे.

 

15:06 PM (IST)  •  20 Oct 2022

Mann Kasturi Re Trailer: त्या रात्री नेमकं काय झालं? 'मन कस्तुरी रे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Mann Kasturi Re Trailer: एका रॅाक कॅान्सर्टद्वारे ‘नाद’ गाण्याचे  जोरदार लाँचिंग झाले. सोशल मीडियावर या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच ‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi Re) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या वेळी अभिनय बेर्डे (Abhinay Berde)   आणि   तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांनी स्कुटीवरून धमाकेदार एन्ट्री केली. या सोहळ्याला अभिनय आणि तेजस्वीसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 

14:00 PM (IST)  •  20 Oct 2022

Photo : फॅशनचा जलवा! शॉर्ट स्कर्ट आणि जॅकेटमध्ये सई ताम्हणकरने दाखवला बोल्ड अंदाज

मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री दररोज आपले नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

13:05 PM (IST)  •  20 Oct 2022

Sachin Ahir: भाजपच्या कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार; सचिन अहिर यांचा आरोप, तर शेलार म्हणतात...

Sachin Ahir:  'मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव' हा कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वरळीमधील जांबोरी मैदान येथे पार पडला. भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा अपमान भाजपनं केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केला आहे. सचिन अहिर यांनी ट्वीट करुन हा आरोप केला आहे. राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) सत्कार केल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केला आहे.

12:08 PM (IST)  •  20 Oct 2022

वैशाली ठक्कर प्रकरणात एक्स-बॉयफ्रेंड राहुल नवलानी पोलिसांच्या ताब्यात, आरोपी पूजाचा शोध सुरु

टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या (Vaishali Thakkar) आत्महत्येप्रकरणी (Vaishali Thakkar Suicide Case) इंदूर पोलिसांनी मुख्य आरोपी असणाऱ्या राहुल नवलानी (Rahul Navlani) याला अटक केली आहे. आरोपी राहुल नवलानी याला पोलिसांनी इंदूरमधून अटक केली आहे. वैशालीने आत्महत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. वैशालीने आपल्या सुसाईड नोटमध्ये राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून पोलीस राहुल आणि त्याच्या पत्नीच्या शोधात होते. मात्र, अद्याप राहुलची पत्नी पूजा फरार आहे.

वाचा संपूर्ण बातमी


11:39 AM (IST)  •  20 Oct 2022

बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा’चं वादळ सुसाट! बिग बजेट चित्रपटांनाही टाकले पिछाडीवर

साऊथ चित्रपट ‘कांतारा’ (Kantara) सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. कन्नड भाषेत रिलीज झालेला हा चित्रपट आता हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम रचले आहेत. या चित्रपटाने अनेक बिग बजेट चित्रपटांना पिछाडीवर टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत या चित्रपटाने किच्चा सुदीपचा ‘विक्रांत रोणा’ आणि दिवंगत अभिनेता पुनीत यांच्या ‘जेम्स’ला देखील मागे टाकले आहे.

 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget