एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 20 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 20 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Ayushmann's Father Demise: अभिनेता आयुष्मान खुरानाला पितृशोक; पी खुराना यांचे निधन

Ayushmann Khurrana Father Pandit P Khurana Passes Away: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) वडील एस्ट्रोलॉजर पी खुराना (P Khurrana)  यांचे निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते.  पी खुराना यांच्यावर मोहालीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  आज (19 मे) त्यांचे निधन झाले. 

33 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘सफरचंद’ ची बाजी

Safarchand: मनोरंजनातून अंजन घालणारी आशयघन नाटकं हे मराठी रंगभूमीचं बलस्थान राहिलं आहे. असाच एक वेगळा विषय  घेऊन रंगभूमीवर दाखल झालेली ‘सफरचंद’ (Safarchand)  ही नाट्य कलाकृती  सध्या चांगलीच गाजतेय. लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी या सिद्धहस्त दिग्दर्शकानं बसवलेल्या  या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या 33 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत (33rd Maharashtr rajya marathi vyavsayik natya spardha) ‘सफरचंद’ या नाटकाने प्रथम पारितोषिकासह बाजी मारली आहे. 

Vaalvi Marathi Movie : सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला 'वाळवी' आता घरबसल्या पाहा

Vaalvi Marathi Movie World Television Premiere : 'वाळवी' (Vaalvi) हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर हा सिनेमा आता प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) होणार आहे. 

The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये मंदाकिनी, संगीता बिजलानी आणि वर्षा उसगावकर यांनी लावली हजेरी

The Kapil Sharma Show: कॉमेडियन कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात.'द कपिल शर्मा शो' च्या  एका एपिसोडमध्ये अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini), संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) आणि वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी हजेरी लावली आहे. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मंदाकिनी, संगीता बिजलानी आणि वर्षा उसगावकर  यांना कपिल हा मजेशीर किस्से सांगताना दिसत आहे. 

16:34 PM (IST)  •  20 May 2023

Vivek Agnihotri: 'कोणत्या फॅशन स्कूलमधून तुम्ही डिग्री घेतली आहे?' ; उर्फी जावेदचा विवेक अग्निहोत्रींना सवाल

Vivek Agnihotri :  ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक  विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित पोस्ट शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकताच विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर अभिनेत्री ऐश्वर्या रायचा (Aishwarya Rai Bachchan) कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील एक फोटो शेअर केला. या फोटोला विवेक अग्निहोत्री यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटला उर्फी जावेदनं  (Urfi Javed)  रिप्लाय दिला आहे.

15:45 PM (IST)  •  20 May 2023

Adipurush: आदिपुरुष चित्रपटातील 'जय श्री राम' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस; नेटकरी म्हणाले, 'अंगावर शहारे आले..'

Adipurush: अभिनेता प्रभासच्या  (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आदिपुरुष चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यानंतर  चित्रपटाच्या टीझरमधील VFX आणि अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) लूक या गोष्टींवर अनेक नेटकऱ्यांनी टीका केली.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला. त्यानंतर अनेकांनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. आता आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटामधील जय श्री राम (Jai Shri Ram Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

15:09 PM (IST)  •  20 May 2023

Sushant Shelar : शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्ष पदी शिवसेना सचिव सुशांत शेलार यांची नियुक्ती

Sushant Shelar : शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्ष पदी शिवसेना सचिव सुशांत शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून निर्माता,लेखन,अभिनय क्षेत्रातील खालील मान्यवरांची कार्यकारिणीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. 

13:41 PM (IST)  •  20 May 2023

Aai Kuthe Kay Karte : आशुतोषला वाटतेय वीणाची काळजी; 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो पाहिलात?

 Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काही दिवसांपूर्वी आशुतोषच्या मानलेल्या बहिणीची एन्ट्री झाली आहे. या बहिणीचं नाव वीणा असं आहे.   वीणा ही गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्धवर विश्वास ठेवत आहे. त्यामुळे आशुतोषला वीणाबाबत काळजी वाटत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

11:34 AM (IST)  •  20 May 2023

Devoleena Bhattacharjee: नेटकऱ्यानं शेअर केलेल्या लव्ह जिहादबाबतच्या ट्वीटला देवोलीनाचा रिप्लाय; म्हणाली, 'ट्रू इंडियन मुस्लिम हे नाव ऐकलंय?'

Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलीनानं  (Devoleena Bhattacharjee)  काही दिवसांपूर्वी शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर अनेकांनी देवोलीनाला ट्रोल केलं. अनेक नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून  देवोलीनाला ट्रोल करतात. नुकताच एका नेटकऱ्यानं लव्ह जिहादबाबत केलेल्या ट्वीटमध्ये देवोलीना आणि तिच्या पतीच्या नावाचा उल्लेख केला. या ट्वीटला देवोलीनानं रिप्लाय दिला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Embed widget