एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 2 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 2 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Shubhvivah: कुंजिका काळविंट करणार नव्या वर्षाची दमदार सुरुवात

Shubhvivah: मनोरंजनाच्या प्रवाहात दर्जेदार मालिका सादर करत स्टार प्रवाह वाहिनीने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट प्रेक्षकांना देण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. प्राईम टाईम मध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच प्रेक्षकांची दुपारही मनोरंजनाने परिपूर्ण करण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न आहे. मुरांबा आणि लग्नाची बेडी या दोन मालिकांना मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका शुभविवाह. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका. अभिनेत्री कुंजिका काळविंट या मालिकेत पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने कुंजिकाची नव्या वर्षाची दमदार सुरुवात होणार आहे. 

Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन

Sudhir Nandgaonkar Passed Away : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर (Sudhir Nandgaonkar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्या कारणाने त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर दुपारी तीनच्या सुमारास माजीवाडा येथे वास्तव्यास असलेले सुधीर नांदगावकर यांनी अखेरचा श्वास घेतला. 

महेश बाबूचा सावत्र भाऊ चौथ्यांदा चढणार बोहल्यावर?

अभिनेता नरेश बाबू (Naresh Babu) आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश (Pavitra Lokesh) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या नरेश हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नरेश हा गेल्या काही दिवसांपासून पवित्राला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. नरेशनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील नरेश आणि पवित्रा यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे मालिकाविश्वात पुनरागमन

गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.  या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe), असं या मालिकेचं नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) मालिकाविश्वात पुनरागमन करत आहेत.

18:07 PM (IST)  •  02 Jan 2023

Rinku Rajguru: आर्चीनं शेअर केला 'बेशरम रंग' गाण्यावरील व्हिडीओ; नेटकरी कमेंट करत म्हणाले, 'एवढा पैसा आलाय तर...'

Rinku Rajguru: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू(Rinku Rajguru) ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असते. रिंकू ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच एक खास व्हिडीओ रिंकूनं शेअर केला आहे. या व्हिडीओमधील रिंकूच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

17:24 PM (IST)  •  02 Jan 2023

Uorfi Javed: उर्फी जावेद विरोधात मुंबईतल्या महिला सामाजिक संस्था झाल्या आक्रमक

Uorfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) हीच्या विरोधात मुंबईतल्या महिला सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. आज या महिला संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य  महिला आयोगाकडे  तक्रार दिली आहे. उर्फी ही सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करत आहे. त्यामुळे समाजातील तरुण मुले मुली यांच्यावर प्रभाव पडत आहे. तिच्या विरोधात सक्त कारवाई करण्याची मागणी, महिला संघटनांनी आज  महिला आयोगाकडे निवेदन देत केली आहे. जर उर्फी वर कारवाई झाली नाही तर तिला रस्त्यावर चोपण्याचा इशारा देण्यात आला आहे.यामध्ये मराठा प्रतिष्ठान,गायत्री महिला सामाजिक विकास संस्था,पंचशील महिला सहकारी संस्था, संजीवनी महिला प्रतिष्ठान,साहियार महिला संस्था या संस्थानी ही तक्रार केली आहे.

17:13 PM (IST)  •  02 Jan 2023

Ved : बॉक्स ऑफिसवर रितेश अन् जिनिलियाचा बोलबाला

Ved Movie : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा 'वेड' (Ved) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत 'वेड' सिनेमाचा समावेश झाला आहे. 

17:04 PM (IST)  •  02 Jan 2023

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, 'अज मैं मूड...'

Amruta Fadnavis:  गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. काही महिन्यांपूर्वी अमृता फडणीस यांचे जय लक्ष्मी माता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. आता अमृता फडणवीस या नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे नवे गाणे रिलीज करणार आहेत. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली.

View this post on Instagram
 
A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

15:24 PM (IST)  •  02 Jan 2023

Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बंद होणार? समीर चौघुलेने एबीपी माझाला दिली माहिती

Samir Choughule On Maharashtrachi Hasyajatra : समीर चौघुले म्हणाले,"महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका बंद होणार ही अफवा आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 5 जानेवारीपासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका बंद होणार ही अफवा आहे. तसेच समीर चौघुलेने हास्यजत्रेला रामराम ठोकलेला नाही". 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRatan Tata Last Rites : रतन टाटांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कारRatan Tata Last Rites : रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी , सुशीलकुमार शिंदेंची हजेरीRatan Tata Last Rites : रतन टाटांना अखेरचा निरोप, मुंबई पोलिसांकडून सलामी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
Embed widget