एक्स्प्लोर

एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा

सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज थेअटरमध्ये एक नंबर (Ek Number) चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली.

Tribute to Ratan Tata In Solapur MNS : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा याचं निधन झालं (Ratan Tata passed away) आहे. त्यांच्या निधनावर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज थेअटरमध्ये एक नंबर (Ek Number) चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या. 

मनसेकडून 'एक नंबर' चित्रपटाचा पहिला शो मोफत दाखवण्यात येतोय

एक नंबर चित्रपटाचा शो सुरु होण्यापूर्वी मनसेकडून रतन टाटांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज मनसेकडून 'एक नंबर' चित्रपटाचा पहिला शो मोफत दाखवण्यात येत आहे. यावेळी मनसेकडून चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मनसैनिकांनी रतन टाटा अमर रहेच्या घोषणा दिल्या. 

रतन टाटा यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला

भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. कट्टर देशभक्त आणि समाजसेवेचा आदर्श जगासमोर उभे करणाऱ्या उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त येताच, सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली जात आहे. भारताचा कोहिनुर, एन्ड ऑफ इरा, प्राईड ऑफ इंडिया, वुई मिस, द ग्रेटेस्ट... या हॅशटॅगसह सोशल मीडिया भावुक झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरून रतन टाटा यांचे फोटो आणि आठवणी शेअर केल्या जात आहेत.

 रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

रतन टाटा यांच्या निधनानंतर आता त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पुन्हा सुरू झाली आहे. रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली जात असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रतन टाटांना भारतरत्न देण्याची विनंती केंद्र सरकारला करणारा प्रस्ताव संमत केला आहे. आता, मनसे राज ठाकरे यांनी देखील  (Raj Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार  (Bharatratna) देण्याची मागणी केली आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Ratan Tata: मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Mahayuti Oath Ceremony : अंबानी, अदानी, सुपरस्टार, नव्या सरकारचा ग्रँड शपथविधीZero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चाEknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवलीDevendra Fadnavis Full PC :पवार - ठाकरेंचा उल्लेख, देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच पत्रकार परिषद गाजवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget