Entertainment News Live Updates 18 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jun 2022 11:20 PM
सरसेनापतींचा हाऊसफुल्ल चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश

Sarsenapati Hambirrao : प्रविण तरडेंचा (Pravin Tarde) 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना टक्कर दिली आहे. आता या सिनेमाने चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅठफॉर्मवर प्रदर्शित होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडेने केली आयुष्यातली पहिली कमाई; रंगला ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ!

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. बदलापूरच्या भारती दबडे यांनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आयुष्यातली पहिली कमाई केली आहे. ज्ञानाच्या साथीनं सर्वकाही शक्य आहे हे त्यांनी त्यांच्या खेळातून प्रेक्षकांना दाखवून दिलं आहे.

Boman Irani : बोमन ईरानी करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण; 17 जूनला प्रदर्शित होणार 'मासूम'

बॉलिवूड अभिनेता बोमन ईरानी (Boman Irani) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. बोमन ईरानीची 'मासूम' (Masoom) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 जूनला ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 

Nishikant Kamat यांच्या आठवणीत पार पडला 'Ruiank'नाट्यमहोत्सव; सेलिब्रिटींची हजेरी

महाविद्यालयीन नाट्यप्रेमी विद्यार्थ्यांसाठी रंगभूमी म्हणजे एकांकिका स्पर्धा. कोरोना महामारीमुळे एकांकिका स्पर्धा झाल्या नाहीत. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने एकांकिका स्पर्धा होऊ लागल्या आहेत. नुकताच रुईया महाविद्यालयाचा 'रुईयांक' (Ruiank) हा नाट्यमहोत्सव पार पडला. या महोत्सवाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

राजकुमार रावच्या 'हिट'चा टीझर आऊट; 15 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजकुमारचा 'हिट- द फर्स्ट केस' (HIT The First Case) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. हा रहस्यमय टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. या सिनेमात राजकुमारसोबत सान्य मल्होत्रादेखील (Sanya Malhotra) दिसणार आहे.

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आयुष्मान खुरानाचा 'अनेक' नेटफ्लिक्सवर होणार रिलीज

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurana) 'अनेक' (Anek) सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा आता नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने नुकतीच यासंदर्भात माहिती दिली आहे.

अक्षय कुमारचा 'राम सेतु' फक्त सिनेमागृहात रिलीज

खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'राम सेतु' (Ram Setu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा आधी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असे म्हटले जात होते. पण आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नसून सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत निखिल राजेशिर्के साकारणार नेहाच्या पहिल्या नवऱ्याची भूमिका

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यश-नेहा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नेहा यशचा सुखी संसार नुकताच सुरू झाला आहे. अशातच मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत यशच्या पहिल्या नवऱ्याची एन्ट्री होणार आहे. 

'शमशेरा' चित्रपटातून रणबीर कपूरचे पोस्टर लीक, पाहा अभिनेत्याचा दमदार लूक

रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. आता शमशेराचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये रणबीर एका दमदार लूकमध्ये दिसत आहे.


 





शिल्पा शेट्टीच्या चित्रपटाने केली चाहत्यांची निराशा, पहिल्याच दिवशी अवघी ‘इतकी’च कमाई!

Nikamma Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता अभिमन्यू दासानी (Abhimanyu Dasani) आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) चित्रपट 'निकम्मा' (Nikamma) 17 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात कमी पडला, असे वाटते आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने निराशा केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटीचीही कमाई केलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट फारसा आवडलेला नसल्याचे दिसते आहे.


‘निकम्मा’ या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने मोठ्या पडद्यावर कमबॅक केले आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसह अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया यांच्याही मुख्य भूमिका आहेत. मीडिया रिपोर्टनुसार 2022 या वर्षातील हा सातवा चित्रपट आहे, ज्याने 1 कोटींपेक्षा कमी व्यवसाय केला आहे.


 



Sidhu Moosewala Murder : सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण; 'मला फसवलं जातंय', शूटर संतोष जाधवचा पोलिसांकडे जबाब

Sidhu Moosewala Murder Case : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी संतोष जाधव यांनं पोलिसांनी सांगितलं आहे की, 'सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येत मी सहभागी नाही, मला फसवलं जातं आहे. मूसेवाला यांची हत्या झाली तेव्हा मी गुजरातमधील मुद्रा बंदराजवळील एका हॉटेलमध्ये होतो.' सिद्धू मूसेवाला हत्याकांडात संतोष जाधवची भूमिका काय होती, याचा तपास करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचं पथकाकडून सध्या मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये तपास सुरु आहे.


या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधवला अटक केल्यानंतर त्याने सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येतील सहभाग स्पष्टपणे नाकारला आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येच्या वेळी तो पंजाबमध्ये नव्हता, असं त्याचं म्हणणं आहे. आपल्याला नाहक  बळीचा बकरा बनवलं जात असल्याचं त्यांनं म्हटलं आहे.


वाचा संपूर्ण बातमी

सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कलम का लावलं?, महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कळवा पोलिसांकडे उत्तर मागितलं

Ketaki Chitale : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतळी चितळेला अटक करण्यात आली. तिच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66 (अ) लावल्यावरुन आता पोलीस अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणात कळवा पोलीस स्टेशनमधील जबाबदार अधिकाऱ्याने केतकी चितळेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66 (अ) का लावलं याचं उत्तर आणि अहवाल मागितला आहे.


सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच रद्दबातल ठरवलेल्या कलमाचा गैरवापर झाल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत अहवाल मागवला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

प्रकाश झा यांच्या आगामी सीरिजमधून नाना पाटेकर करणार कमबॅक, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!

Nana Patekar : बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे केवळ उत्तम अभिनेतेच नाहीत, तर ते लेखक आणि चित्रपट निर्मातेही आहेत. नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना नेहमीच प्रभावित केले आहे. त्याच्या खास संवाद शैलीसाठी ते विशेष ओळखले जातात. नाना पाटेकर फिल्म इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहेत. अभिनेते नाना पाटेकर बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. मात्र, नाना पाटेकर ‘आश्रम 4’मध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.


आता नाना पाटेकर यांनी त्यांच्या कमबॅक प्रोजेक्टबाबत अनेक खुलासे केले आहेत. प्रकाश झा यांच्या वेब सीरिजमधून मी पुनरागमन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, ही वेब सीरिज ‘आश्रम’ नसून ‘लाल बत्ती’ असणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, ‘लाल बत्ती’ ही सामाजिक राजकीय वेब सीरिज असणार असून, या मालिकेद्वारे नाना पाटेकर आणि प्रकाश झा पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

अजिंक्य राऊत-शिवानी बावकरची जमली जोडी! ‘नाते नव्याने’ प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

Naate Navyane : एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या एव्हरेस्ट म्युझिकने ‘नाते नव्याने’ हे ‘थोडे अलवारसे, थोडे हळुवारसे...’ या मुखडयाचे प्रेमगीत प्रदर्शित केले असून, एव्हरेस्ट म्युझिकच्या युट्युबवर या व्हिडीओला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या गाण्यात टीव्ही विश्वातील प्रसिद्ध कलाकार अजिंक्य राऊत (Ajinkya Raut)-शिवानी बावकरची (Shivani Baokar) जोडी जमली आहे.


‘नाते नव्याने’ या गाण्याचे टीझर आणि ट्रेलर बुधवारी दाखल करण्यात आले होते. त्यांना संगीत रसिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. या टीझर आणि ट्रेलरमध्ये या गाण्याची एकूण पार्श्वभूमी समोर येते. हे गाणे एका प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. ही प्रेमकथा आहे मायरा आणि जय यांच्यातील. काहीशी गुंतागुंतीची आणि काहीशी गोंधळाच्या परिस्थितीतील ही प्रेमकथा आहे. यातील प्रेमाच्या भावना या नितळ आहेत, पण नायक मात्र नायिकेसमोर त्या मांडायला कचरतो आहे. या गोष्टी स्पष्टपणे समोर येतात आणि त्यामुळे मग गाण्याच्या मुख्य व्हिडीओबद्दलची उत्सुकता अधिक ताणली जाते.


वाचा संपूर्ण बातमी

करण जोहरकडून 5 कोटी रुपये खंडणी वसूल करण्याच्या तयारीत होतो, सौरव महाकालचा मोठा गौप्यस्फोट!

Sidhu Moose Wala Case : सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) आणि मोक्का प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सौरव ​​महाकाल (Saurabh Mahakal) उर्फ सिद्धेश कांबळे याने पुणे पोलिसांना दिलेल्या जबाबात मोठा गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माता कारण जोहर याच्याकडूनही 5 कोटी रुपयांची खंडणी वसूल करणार होतो, असे सौरव उर्फ महाकाळ याने आपल्या जबाबात म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांच्या चौकशीदरम्यान सौरवने हा जबाब नोंदवला आहे.  


सलमान खान धमकी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सौरवने पुणे पोलिसांनी दिलेल्या जबाबानुसार, सौरव ​​महाकाल आणि बिश्नोई गॅंगच्या हिटलिस्टमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान व्यतिरिक्त, प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर याच्या नावाचाही समावेश होता.


वाचा संपूर्ण बातमी

सिद्धू मूसेवालाच्या गाण्याचा नवा विक्रम, ‘बिलबोर्ड 200’च्या यादीत ‘295’ला मिळाले मानाचे स्थान!

Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांची फॅन फॉलोइंग देशातच नाही, तर परदेशातही आहे. आता सिद्धू मूसेवालांच्या '295' या गाण्‍याने जागतिक ‘बिलबोर्ड 200’च्‍या यादीमध्‍ये स्‍थान निर्माण केले आहे. मात्र, हे यश पाहायला सिद्धू आज आपल्यात नाहीत.  या विक्रमानंतर चाहते त्‍यांची आठवण करून भावूक होत आहेत आणि सोशल मीडियावर आपल्‍या प्रतिक्रिया देत आहेत. या आठवड्यात सिद्धू मूसेवाला यांचे ‘295’ हे गाणे जागतिक बिलबोर्ड यादीत 154व्या क्रमांकावर आहे.


सिद्धू मुसेवाला यांचे खरे नाव शुभदीप सिंह होते. 'सो हाय', 'द लास्ट राईड' आणि 'जस्ट लिसन' सारखी गाणी गाऊन त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती. सिद्धू मूसेवाला यांचे '295' हे गाणे जुलै 2021मध्ये रिलीज झाले होते. यूट्यूबवर हे गाणे ऐकणाऱ्यांची संख्याही दोन कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. 100 म्युझिक व्हिडीओंच्या जागतिक यादीत हे गाणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. याशिवाय 'द लास्ट राईड' हे गाणे आता सहाव्या स्थानावर पोहोचले आहे. यूट्यूबवर या व्हिडीओला 73 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. YouTube Musicवरील जागतिक यादीत '295' चौथ्या क्रमांकावर आहे.


वाचा संपूर्ण बातमी

नवी ‘दया बेन’ सापडली! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली दया भाभीच्या भूमिकेसाठी विचारणा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. काही या मालिकेतील कथानक, तर कधी कलाकार सतत काहीना काही कारणामुळे मालिका प्रसिद्धी झोतात आली आहे. अनेक कलाकार सध्या या मालिकेला रामराम ठोकण्याच्या विचारात आहेत. काहींनी ही मालिका सोडल्याचीही चर्चा सुरु आहे. मात्र, यातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे ‘दया भाभी’. गेल्या चार वर्षांपासून ही व्यक्तिरेखा मालिकेत दिसत नसल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत.


लवकरच या मालिकेत दया भाभी परत येणार आहे. या बातमीमुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दयाबेन बनून सर्वांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री दिशा वाकाणीने काही वर्षांपूर्वी या शोला निरोप दिला होता. मात्र, त्यानंतर आजपर्यंत प्रेक्षक तिच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. यादरम्यान अनेक अभिनेत्रींची नावेही समोर आली.  पण, दयाबेन या मालिकेत परतलीच नाही.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


मिका सिंहचे जोधपूरमध्ये होणार स्वयंवर; 19 जूनपासून कार्यक्रमाला सुरुवात


Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंह (Mika Singh) हा लोकप्रिय गायक असून त्याची अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मिका सिंहचा 'स्वयंवर मीका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) या कार्यक्रम गेल्या महिन्यापासून चर्चेत होता. आता 19 जूनपासून प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. मिकाचे चाहतेदेखील या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत.


मिका सिंह 'स्वयंवर मीका दी वोटी' या कार्यक्रमासाठी उत्सुक आहे. मिका सिंहचे स्वयंवर जोधपूरमध्ये होणार आहे. मिका सिंहचे स्वयंवर थाटामाटात होणार आहे. सोशल मीडियावर मिका सिंहच्या स्वयंवराचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 14 मे रोजी मिका सिंहचा खास मित्र कपिल शर्मादेखील मिका सिंहच्या स्वयंवरासाठी जोधपूरला गेला होता. लवकरच मिका सिंहच्या बॅचलर्स पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.


'स्वयंवर मीका दी वोटी' हा कार्यक्रम 19 जूनपासून स्टार भारतवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मिकाला जोडीदार शोधण्यासाठी अनेक सेलिब्रिटी मदत करताना दिसणार आहेत. मीकाचे 'मीका दी वोटी' हे गाणं सध्या चर्चेत आहे. या गाण्याचे बोल मिकाने लिहिले असून संगीतबद्धदेखील मिकानेच केलं आहे. मिकाचे ग्रॅंड स्वयंवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची प्रेयसी म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.