Sidhu Moose Wala Case : करण जोहरकडून 5 कोटी रुपये खंडणी वसूल करण्याच्या तयारीत होतो, सौरव महाकालचा मोठा गौप्यस्फोट!
Sidhu Moose Wala Case : सिद्धू मुसेवाला आणि मकोका प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे याने पुणे पोलिसांना दिलेल्या जबाबात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Sidhu Moose Wala Case : सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) आणि मोक्का प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सौरव महाकाल (Saurabh Mahakal) उर्फ सिद्धेश कांबळे याने पुणे पोलिसांना दिलेल्या जबाबात मोठा गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माता कारण जोहर याच्याकडूनही 5 कोटी रुपयांची खंडणी वसूल करणार होतो, असे सौरव उर्फ महाकाळ याने आपल्या जबाबात म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांच्या चौकशीदरम्यान सौरवने हा जबाब नोंदवला आहे.
सलमान खान धमकी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सौरवने पुणे पोलिसांनी दिलेल्या जबाबानुसार, सौरव महाकाल आणि बिश्नोई गॅंगच्या हिटलिस्टमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान व्यतिरिक्त, प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर याच्या नावाचाही समावेश होता.
करण जोहरकडून 5 कोटींची खंडणी वसुल करण्याची तयारी
सौरव महाकाल याने पुणे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला त्यांनी करण जोहर प्रमुख जबाबदार मानले होते आणि त्यामुळेच तो बिश्नोई गॅंगच्या हिटलिस्टमध्ये सामील होता आणि त्यामुळेच बिश्नोई गॅंग चित्रपट निर्माता करण जोहर याला धमकावून 5 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या तयारीत होती.
सौरव महाकाल याने आपल्या जबाब नोंदवताना सांगितले आहे की, सिग्नल अॅपच्या माध्यमातून तो विक्रम ब्रारशी जोडला गेला होता आणि तो फक्त विक्रम ब्रारसाठी काम करत होता. अशा परिस्थितीत त्याला बिष्णोई गॅंगच्या अनेक हालचाली आणि लक्ष्यांची माहिती होती.
पुणे पोलीस करणार अधिक तपास
सौरवने दिलेल्या या माहितीनंतर पुणे पोलीस त्याच्या वक्तव्यातील सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करत असून, त्यात लॉरेन्स बिश्नोईची चौकशीही महत्त्वाची ठरणार आहे. सिद्धू मुसेवाला प्रकरणातील काही शार्प शुटर्सच्या नावांचा खुलासा केला होता. त्यामध्ये महाकालचंही नाव होतं. पुण्यात दाखल झालेल्या मक्का प्रकरणात सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक करण्यात आली आहे. पण मुसेवाला हत्या प्रकरणी पंजाब पोलीस चौकशी करणार आहेत. दरम्यान, सौरभ महाकाल हा संतोष यादव गँगचा सदस्य आहे. संतोष यादववर (Santosh Yadav Gang) यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. महाकालचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशीही संबंध असून त्याच्यावर राजस्थानमध्येही काही गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा :
Moosewala Murder Case : पंजाबी गायक मुसेवाला हत्येप्रकरणातील आरोपी सौरव महाकाल अटकेत
Sidhu Moose Case : शार्प शूटर महाकाल उलगडणार मुसेवालांच्या हत्येचं रहस्य? पंजाब पोलिसांकडून चौकशी